सलमान खानने स्वीकारले 'हम फिट तो इंडीया फिट' चॅलेंज (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

आता दबंग सलमान खाननेही हे चॅलेंज स्वीकारत आपला व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. किरण रिजिजू यांनी हे चॅलेंज सलमान खानला दिलं होतं. 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये फिटनेस चॅलेंज सोशल मिटीयावर व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत अनेक फोटोज् आणि व्हिडीओज् सोशल मिडीयावर अपलोड केले. क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठौंड यांनी हे चॅलेंज 'हम फिट तो इंडीया फिट' असे हॅशटॅग देत सोशल मिडीयावर दिले होते. त्यानंतर अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारले. 

या फिटनेस चॅलेंज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, विराट कोहली, ऋतिक रोशन, अनुष्का शर्मा इत्यादी सेलिब्रिटींनी पुर्ण केले. आता दबंग सलमान खाननेही हे चॅलेंज स्वीकारत आपला व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. किरण रिजिजू यांनी हे चॅलेंज सलमान खानला दिलं होतं. 

या व्हिडीओत सलमान सायकलिंग करताना आणि जिम मध्ये व्यायाम करताना दिसत आहे. सलमान सध्या माल्टा येथे 'भारत'च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.     
 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Salman Khan Accepted Hum Fit To India Fit Challenge