Aithey Aa Song : 'भारत'चं तिसरं गाणं 'ऐथे आ' प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 May 2019

'भारत'मधील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. पहिले 'स्लो मोशन' आणि दुसरे 'चाशनी'. आता तिसरं 'ऐथे आ' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

यावर्षी अभिनेता सलमान खानचा ईदला प्रदर्शित होणारा चित्रपट 'भारत'चं तिसरं 'ऐथे आ' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना कैफ नृत्य करताना दिसत आहेत. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. 

हे गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती सलमानने 'शादी वाला देशी गाना' असे लिहीत सोशल मिडीयावर दिली. या गाण्याच्या सुरवातीला सलमानचा एक डायलॉग आहे की, 'इंडिया वर्ल्ड कप जीत चुका था, लेकिन दिल हार चुका था भारत'. 

'ऐथे आ' गाणं विशाल ददलानी, शेखर रावजियानी, नीति मोहन, कमाल खान आणि अकासा सिंह यांनी गायिले आहे. इरशाद कामिल यांनी हे गाणं लिहीले आहे तर वैभवी मर्चंट यांनी गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. 

यापुर्वी 'भारत'मधील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. पहिले 'स्लो मोशन' आणि दुसरे 'चाशनी'. ईदला म्हणजेच 5 जूनला चित्रपट प्रदर्शित होईल. 'भारत' हा कोरियन चित्रपट 'एन ओड टू माई फादर'चा हिंदी रिमेक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan And Katrina Kaifs Aithey Aa Song From Bharat Released