Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानचा पूजासोबत रोमँटिक अंदाज... 'नय्यो लगदा' गाणं रिलीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan and pooja hegde

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानचा पूजासोबत रोमँटिक अंदाज... 'नय्यो लगदा' गाणं रिलीज

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan New Song release: सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा धमाकेदार टीझर आधीच खळबळ माजवत आहे, तर आता चित्रपटाचे पहिले गाणे 'नय्यो लगदा' रिलीज झाले आहे.

या गाण्यात पूजा हेगडेसोबत भाई जानची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील अॅक्शनसोबत सलमान खानचा रोमँटिक स्टाईल सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.

'नयो लगदा' या गाण्याचे संगीत हिमेश रेशमियाने दिले आहे, तर कमाल खान आणि पलक मुच्छाल यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

पूजा हेगडा आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदाच चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार आहे. या जोडीला चित्रपटाच्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक आहे, तर या गाण्यात दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अप्रतिम आहे.

बऱ्याच दिवसांनंतर सलमान खान चित्रपटाच्या पडद्यावर परतणार आहे. 2021 मध्ये तो 'अंतिम' चित्रपटात दिसला होता. यादरम्यान त्याने 'पठाण' व्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या असल्या, तरी मुख्य अभिनेता म्हणून तो बऱ्याच दिवसांनी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे.

सलमान खानच्या पुनरागमनाबद्दल त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. 'किसी का भाई किसी की जान'ने आधीच प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटात साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स दिसणार आहेत.

या चित्रपटाची निर्मिती सलमान खान करत आहे, तर फरहाद सामजी 'किसी का भाई किसी की जान' दिग्दर्शित करत आहेत.

सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

त्याचवेळी, हनी सिंग आणि 'RRR' फेम राम चरण यांच्या कॅमिओ भूमिका देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :salman khanpooja hegade