'मी घाबरलो आहे' असं म्हणत सलमान खानने शेअर केला भावूक व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

बॉलीवूडचा दबंग सलमान खानने त्याच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे..या व्हिडिओमध्ये तो त्याच्या कुटुंबाला गेल्या ३ महिन्यापासून भेटला नाही हे सांगताना भावूक झाला आहे..

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संकटामुळे कित्येक दिवस देशातील सामान्य माणूस ते सेलिब्रिटी पर्यंत सगळेच घरात बसले आहेत..सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर तुम्ही जिथे असाल तिथेच राहण्याचं आवाहन केलं गेलं होतं..त्यामुळे सेलिब्रिटी देखील जिथे आहे तिथेच अडकले आहेत.मात्र काही नागरिक आहेत जे आपल्या घराच्या ओढीने त्यांच्या घरी किंवा गावी पायी चालत निघाले आहेत..ही अशी परिस्थिती पाहून बॉलीवूडचा दबंग सलमान खानने त्याच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे..या व्हिडिओमध्ये तो त्याच्या कुटुंबाला गेल्या ३ महिन्यापासून भेटला नाही हे सांगताना भावूक झाला आहे..

coronavirus: कनिका कपूरला अखेर हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, मात्र 'या' अटीवर

या व्हिडिओमध्ये सलमान सोबत त्याचा लहान भाऊ सोहेलचा मुलगा निर्वाण बसलेला दिसून येतोय...यात तो सांगतोय की, निर्वाणने ३ आठवड्यांपासून त्याच्या वडिलांना पाहिलेलं नाहीये..हे लोक कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी इथे आले होते आणि मग लॉकडाऊन जाहीर झाल्याने इथेच अडकले..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Be Home n Be Safe @nirvankhan15

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

तसंच सलमानने सांगितलं की त्याचे वडिल सलीम खान हे ही तीन महिन्यांपासून घरी एकटे आहेत..या व्हिडिओमध्ये सलमान पुढे जाऊन हे सांगतोय की, 'जो डर गया वो मर गया' हा सिनेमाचा डायलॉग या परिस्थितीला लागू होत नाहीये याउलट कोरोनो व्हायरस विरुद्ध लढण्याासाठी 'जो डर गया वही बच गया' म्हणजेच 'जो घाबरेल तोच वाचेल' असं म्हटलं आहे..

Salman Khan Emotional On Dus Ka Dum Set Watch Salim Khan Message ...

या व्हिडिओमध्ये सलमान त्याच्या चाहत्यांना घरातंच राहण्याचं आवाहन करत आहे..सोबतंच तो हे ही म्हणाला की मी घाबरलो आहे म्हणूनंच मी घरात आहे..सलमान त्याच्या चाहत्यांना सांगतोय की 'तुम्हीही घाबरा आणि घरात रहा..' यावेळी घाबरुन घरी राहण्यातंच शहाणपण आहे.. 

सलमान सध्या त्याच्या कुटुंबासोबत पनवेल येथील फार्महाऊसवर आहे..सलमानसोबत सोहेलची मुलं, अर्पिता आणि तिचं कुटुंब देखील या फार्महाऊसवर एकत्र आहेत..मात्र सलमानचे वडिल सलीम खान आणि आई सलमा खान हे मुंबई येथील घरी आहेत..

salman khan is away from father salim khan due to lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan is away from father salim khan due to lockdown