सलमान खान बारामतीत काय करतोय?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

- अभिनेता सलमान खान सध्या बारामतीमध्ये आहे.

- सलमान खान बारामतीत काय करतोय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडण खुप सहाजिक आहे.

- तर! सलमान खान त्याच्या 'दबंग 3' या चित्रपटाच्या शूटिंग साठी सध्या बारामती मध्ये आहे.

बारामती : अभिनेता सलमान खान सध्या बारामतीमध्ये आहे. सलमान खान 'बारामतीत काय करतोय?' असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडणं खुप सहाजिक आहे. तर! सलमान खान त्याच्या 'दबंग 3' या चित्रपटाच्या शूटिंग साठी सध्या बारामती मध्ये आहे.

22 जुलैपर्यंत बारामती आणि फलटन या ठिकाणांवर या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. यावेळी सलमान खानला पाहण्यासाठी बारामताकरांनी गर्दी केली आहे. दबंग खान आपल्या गावात आल्यांनंतर आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी घराच्या छतावर, गच्चीवर चढत आहेत. इतकच काय तर, शिट्ट्या वाजवून त्याला दादही देत आहेत.

दबंग 3 हा दबंग या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल असून या चित्रपटाची उत्सुक्ता  चाहत्यांनामध्ये नक्कीच आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता सलमान खानसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, महेश मांजरेकर यांची मुलगीही झळकणार आहे. प्रभुदेवा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

शूटिंग सुरू असताना  ओपन जीप मधला सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल होतांना आपल्याला दिसतोय. ह्या जीपने 25 हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात  काम केले असून जीपच्या मालकाचे नाव राहुल जगताप आहे! आता या जीपचे पर्दापण, दबंग 3 मध्येही आपल्याला बघायला मिलणार आहे!

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan at baramati