विकी-कतरिनाच्या लग्नाला सलमानचा 'बॉडीगार्ड'

विकी-कतरिनाच्या लग्नाला सलमानचा 'बॉडीगार्ड'

अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे लग्न करण्यास पूर्णपणे सज्ज झाले आहेत. लग्नात दोघांचे कुटंबीय आणि जवळचे काही लोक यांची उपस्थिती राहिल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडच्या 120 कलाकारांना निमंत्रण मिळाले आहे. कतरीना आणि विकी यांच्या लग्नाची चर्चा जोरदार चालली असून, या दोघांनी मात्र अजूनही याबाबत काहीच खुलासा केला नाही.

विकी-कतरिनाच्या लग्नाला सलमानचा 'बॉडीगार्ड'
'लग्नाला यायचं हं'!, अंकितानं दिलं राज्यपालांना निमंत्रण

दोघेही 9 डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार असून, गेल्या काही दिवसांपासून उत्साहात तयारी सुरू आहे. लग्न सोहळा राजस्थानमध्ये पार पडणार असून, सगळीकडे कडक सुरक्षा बंदोबस्त केला आहे. त्याच बरोबर लोकांच्या हालचालींवर निर्बंध देखील घातले गेले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, विकी आणि कॅटच्या लग्नात सलमान खानचा बॅाडीगार्ड 'शेरा' आणि त्याची टीम सुरक्षा बंदोबस्त पाहणार आहेत अशी माहिती मिळत आहे. शेरा स्वतःची 'टायगर सेक्यूरीटी' नावाची कंपनी चालवतो.

दरम्यान, लग्न कार्य हे 4 डिसेंबरपासूनच सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. 7 डिसेंबरला संगीत, व त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी खास रिस्पेशन सोहळाही पार पडणार आहे.

विकी-कतरिनाच्या लग्नाला सलमानचा 'बॉडीगार्ड'
मालिका सोडली कारण, 'भाभीजी घर पर हैं' मधल्या अभिनेत्रीचा खुलासा

रविवारी(5 डिसेंबर ) संध्याकाळी, ब्राईड-टू-बी कॅट तिच्या आई सोबत विकीच्या बिल्डींग बाहेर दिसली होती. तिने पांढऱ्या रंगाच्या साडी नेसली होती, त्यावर मोठे झुमके घातले होते आणि केस मोकळे सोडले होते. कटरीना या साडीत फारच सुंदर दिसत होती. तसेच विकी सुद्धा शनिवारी रात्री कतरीनाच्या घरी दिसला होता अशी चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com