Salman Khan Death Threat : सलमानला जीवे मारण्याच्या धमकीचं निघालं 'युके कनेक्शन'? मुंबई पोलिसांना मिळाली नवी माहिती!

Salman Khan Death Threat: लॉरेन्सनं सलमानला थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. काळवीट शिकार प्रकरणात सलमाननं आमच्या समाजाची माफी मागावी अशी मागणी लॉरन्सेनं केली होती.
Salman Khan Bollywood Actor Death Threats News
Salman Khan Bollywood Actor Death Threats Newsesakal

Salman Khan Bollywood Actor Death Threats : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेल व्हायरल झाला आणि चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. त्यांना सलमानची चिंता वाटू लागली. अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्याप्रती काळजीपर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही दिवसांपासून भाईजानचा जीव वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला याच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी लॉरेन्स बिष्णोईची जेलमधून मुलाखत व्हायरल झाली होती. यामध्ये त्यानं बॉलीवूडवरुन वेगवेगळे धक्कादायक खुलासे केले होते. त्यात लॉरेन्सनं सलमानला थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काळवीट शिकार प्रकरणात सलमाननं आमच्या समाजाची माफी मागावी अशी मागणी लॉरन्सेनं केली होती.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

सलमाननं माफी मागितल्यास विषय संपून जाईल. त्यानं आम्हाला,समाजाला अपमानित केले आहे. त्यानं माफी न मागितल्यास आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई करु अशी आक्रमक भूमिका लॉरेन्सनं घेतली होती.

यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. यासगळ्यात मुंबई पोलिसांच्या हाती नवी माहिती आली आहे.

सलमानला जीवे मारण्याचा जो मेल आहे त्याचे कनेक्शन थेट लंडनशी आहे असे म्हटले जात आहे. गँगस्टल लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी बरार यांच्याकडून ही धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्यात परदेशातील मोठी नावं समाविष्ट असल्याचे बोलले जात आहे. सलमानला जीवे मारण्याच्या धमकीत ही नवी माहिती समोर आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली त्या लॉरेन्स आणि गोल्डी बरार यांचे कनेक्शन देखील युकेशी संबंधित आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणामध्ये देखील नवे ट्विस्ट येणार असल्याचे दिसून आले आहे.

टाईम्स नाऊनं यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. सलमानला जीवे मारण्याची धमकीचा जो मेल आहे त्याचा नंबर जेव्हा शोधण्यात आला तेव्हा तो युकेमधला असल्याचे दिसून आले आहे.

Salman Khan Bollywood Actor Death Threats News
Salman Khan: तो तर टायगर! असल्या धमक्यांना भिक घालत नाय.. फॅमिली फ्रेंडने केला खुलासा

मेल आय़डीशी संबंधित आणखी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तो तपास अद्याप सुरु आहे. पोलिसांना मात्र तो क्रमांक युकेशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे.

रविवारी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोईच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये बिष्णोई आणि गोल्डी बरार यांनी मेल पाठवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Salman Khan Bollywood Actor Death Threats News
Salman Khan: लॉरेन्स बिश्नोईचे 5 शॉकिंग खुलासे.. म्हणाला,'सलमानला जरी मी नाही मारू शकलो तरी..'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com