Salman Khan च्या कोलकाता येथील कॉन्सर्टचं तिकीट आहे 3 लाखाचं.. जाणून घ्या निव्वळ 700 रुपयात कशी मिळणार आहे एन्ट्री.. Da-bangg Tour | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Concert Update

Salman Khan च्या कोलकाता येथील कॉन्सर्टचं तिकीट आहे 3 लाखाचं.. जाणून घ्या निव्वळ 700 रुपयात कशी मिळणार आहे एन्ट्री..

Salman Khan Concert Update: 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या रिलीजनंतर सलमान खान पुन्हा एकदा दबंग टूरवर जाण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी सलमान विदेशात नाही तर भारतातच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सलमान आपल्या बॉलीवूडच्या ग्रुपसोबत कोलकाता कॉन्सर्ट करण्यासाठी सज्ज आहे.

सलमान खानच्या या दबंग टूरमध्ये सोनाक्षी सिन्हा,जॅकलिन फर्नांडिस,पूजा हेगडे,प्रभुदेवा,आयुष शर्मा,मनिष पॉल,गुरू रंधावा सारखे कलाकार दिसणार आहेत. काही दिवस आधी सलमान खाननं स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या टूरविषयी माहिती दिली होती.(Salman Khan Concert dabangg tour kolkata ticket price how to book seats know in details)

सलमान खानचा कॉन्सर्ट असेल आणि लोक तो पहायला जाणार नाहीत असं मुळीच होणार नाही. पण जे लोक सलमानच्या दबंग टूरमध्ये सामिल होणार आहेत त्यांना त्याचं तिकीट खरेदी करण्यासाठी मात्र आपला खिसा खाली करावा लागणार आहे, चला जाणून घेऊया कॉ न्सर्टच्या तिकिटाची किंमत नेमकी आहे किती?

इनसाइडर डॉट इन वर दबंग टूरच्या तिकिटी विकल्या जात आहेत. १३ मेला होणाऱ्या या कॉन्सर्टच्या तिकीटांची सुरुवात ६९९ रुपयांपासून होणार आहे,पण सर्वात जास्त किमतीचं तिकीट ३ लाख इतकं आहे.

हे आहेत दंबग तिकिटाचे दर..

699 (PWD Gallery- Zone 10) 1250 ((PWD Gallery- Zone 11) 1500 (भाईजान झोन PWD Gallery- Zone 10) 2250 (टायगर झोन) 2500 ( किक झोन) 3000 (भाईजान झोन) 4000 (सुल्तान झोन) 6000 (वॉन्टेड झोन) 12000 (रेडी झोन) 60000 (दबंग झोन) 1 लाख (लाउंज- 2) 2 लाख (लाउंज-2) 3 लाख (लाउंज-1)

सलमान खानचा हा कॉन्सर्ट शनिवारी म्हणजे १३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणार आहे. यासाठी कोलकाताच्या ईस्ट बंगाल क्लबच्या मैदानाला व्हेन्यूसाठी पसंती देण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार कोलकाता इथे होणारा हा कॉन्सर्ट आधी जानेवारी महिन्यात होणार होता पण सुरक्षेच्या कारणास्तव हा कॉन्सर्ट मे मध्ये आयोजित करण्यात आला.