सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan

Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Salman Khan Death Threat Case: काही दिवसांपूर्वी बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला चर्चेत आहे. त्याला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकणाच्या तपासाकरिता कंबर कसली होती. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे.

या प्रकरणातील आरोपींचे कनेक्शन जोधपूरशी संबंधित असल्याचे निष्पन्न काही दिवसांपुर्वीच समोर आले होते. मुंबई आणि जोधपूर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला जोधपूर येथील रोहीचा काला येथून पकडून जोधपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सलमान खानला मिळालेल्या धमकीनंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ज्या व्यक्तीने सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती ती आता पोलिसांच्या ताब्यात आहे. याच व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

 पोलिसांनी आरोपीच्या गुन्हेगारी रेकॉर्डचा तपास केला असता, सरदारपुरा येथे २०२२ मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

नवाजची 3 लग्न..त्यानं वहिनीला गरोदरपणात मारली लाथ! मानहानीचा खटला करताच शमासचे पुन्हा 11 गंभीर आरोपसलमानला जीवे मारण्याचा जो मेल आहे त्याचे कनेक्शन थेट लंडनशी असेही म्हटले जात होते. गँगस्टल लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार यांच्याकडून ही धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती होती.

सलमान खानचे हे प्रकरण जोधपूरमधील सुमारे 22 वर्षे जुनं आहे आणि हरणाच्या शिकारीच्या घटनेशी संबंधित आहे. 

पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जोधपूर कोर्टात हजेरी लावताना जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यानंतर सलमानच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरणही समोर आले आहे. 

आता पुन्हा एकदा आरोपीने सलमानला धमकी दिल्यानंतर त्याचं कनेक्शन लॉरेन्स बिश्नोईशी जोडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजस्थान पोलिसांच्या मदतीने घेतलं या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून आता त्याची चौकशी सुरु आहे. आता या प्रकरणात आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.