सलमान आणि तिच्या नात्याबाबत काय म्हणाली कतरिना...

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

सलमान एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकते आणि त्यामुळे मी आजही त्याच्यासोबत आहे.

मुंबई : सलमान खान आणि कतरिना या दाेघांच्या नात्याबाबत कायमच जाेरदार चर्चा सुरु असते. एका मुलाखती दरम्यान कतरिनाने त्यांच्यात असणार्या नात्याबाबत सांगितले आहे.   

ती  म्हणते, मी आणि सलमान खूप चांगले मित्र आहोत. सलमान एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकते आणि त्यामुळे मी आजही त्याच्यासोबत आहे. माझं त्याच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलवीरा यांच्याशीही खूप चांगलं नातं आहे. त्या दोघीही माझ्या तेवढ्याच जवळच्या आहेत. जेवढ्या त्या सलमानसाठी जवळच्या आहेत.

कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना आवडते. तेवढ प्रेक्षक त्यांना ऑफस्क्रीन सुद्धा पसंत करतात. सोशल मीडियावर तर त्यांच्या नात्याविषयी अनेकदा बोललं जातं. मात्र हे दोघंही या सर्व फक्त अफवा असल्याचं सांगतात. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिना सलमानसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणानं बोलली. सलमान आणि तिच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हेही तिनं स्पष्ट केलं.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कतरिना म्हणाली, सलमान आणि माझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री जशी आहे तरी रिअल लाइफमध्ये अजिबात नाही. पण त्यानं मला प्रत्येकवेळी मदत केली आहे. एक मित्र म्हणून तो प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभा असतो. प्रत्येक यशानंतर माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

कतरिना सांगते, मी आणि सलमान खूप चांगले मित्र आहोत. सलमान एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकते आणि त्यामुळे मी आजही त्याच्यासोबत आहे. माझं त्याच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलवीरा यांच्याशीही खूप चांगलं नातं आहे. त्या दोघीही माझ्या तेवढ्याच जवळच्या आहेत. जेवढ्या त्या सलमानसाठी जवळच्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman khan is a friend for life he has really had my back says katrina kaif