
Salman Khan: 'टायगर जख्मी है'! सलमानला गंभीर दुखापत...
Salman Khan Injured: सलमान खान नुकताच किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकला नाही. या चित्रपटानंतर सलमान त्याचा आगामी चित्रपट टायगर ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, शूटिंगदरम्यान अभिनेता जखमी झाल्याची बातमी आहे.
सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी स्पाय थ्रिलर चित्रपट टायगर 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान या शुटिंग दरम्यान त्याच्यासोबत एक अपघात झाला आहे. त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
सलमानने पोस्टवर सेटचा फोटो शेअर केला आणि त्याच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. फोटोत तो त्याच्या डाव्या खांद्यावर पॅच लावलेला दिसत आहे. कॅमेर्याकडे पाठ फिरवुन त्याने फोटो शेअर केला आहे.
त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये शर्टलेस पोज दिल्याने अभिनेता त्याच्या खांद्यावर आणि पाठीवर पट्टी बांधताना दिसला. त्याने फोटोला कॅप्शन दिले आहे की, "जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जगाचं वजन तुमच्या खांद्यावर पेलू शकतात, तेव्हा तो म्हणतो जग सोडा आणि मला पाच किलोचा डंबेल दाखवं." त्याचबरोबर त्याने “टायगर जख्मी है” असा पंचही त्याने मारला.
या फोटोत सलमान खान शर्टलेस दिसत आहे. त्याच वेळी, त्याच्या पाठीवर एक पट्टी आहे. हे चित्र समोर आल्यानंतर, चाहते खूपच चिंतेत आहेत आणि अभिनेत्याला प्रतिक्रियेद्वारे लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
सलमान लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केली. एका चाहत्याने लिहिलयं की, “लवकर बरा हो” “स्वतःची काळजी घे,” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “वाघ शिकार करण्यासाठी लवकर बरा होतो.” तर एकानं लिहिलयं की, “टायगर बॉक्स ऑफिसवर गर्जना करेल. तर एकान लिहिलं की, “जख्मी टायगर जास्त खतरनाक असतो".