'माझ्याशी लग्न कर', भर कार्यक्रमात तिनं केलं प्रपोज! सलमान म्हणाला,..Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan:

Salman Khan: 'माझ्याशी लग्न कर', भर कार्यक्रमात तिनं केलं प्रपोज! सलमान म्हणाला,..

Salman Khan: सलमान खान हे बॉलिवूडमधलं असं नाव आहे ज्याचे चाहते हे साता समुद्रापास पसरलेले आहे. सलमाननं अनेक चित्रपटांमधुन त्याची अशी ओळख बनवली आहे की त्यामुळे त्याचे लाखो चाहते आहेत. चित्रपटांशिवाय सलमान अनेक कारणामुळे चर्चेत असतो.

सलमान आता 57 वर्षाचा आहे .तो चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. चित्रपटात जरी त्याच नाव प्रेम असलं तरी खऱ्या आयुष्यात तो प्रेमाच्या बाबतीत खुपच अनलकी ठरला आहे.

ऐश्वर्या राय बच्चन पासून ते कतरिना कैफ पर्यंत अनेक अभिनेत्रीसोबत त्याच नाव जोडलं गेलं. सलमान लग्न कधी करणार हा प्रश्न तर त्याला नेहमीच विचारला जातो. दरम्यान अलीकडेच शुक्रवारी आयफा अवॉर्ड्सचा कार्यक्रमात हॉलिवूडमधील एका पत्रकारानं सलमानला लग्नाची मागणी घातली.

ती सलमानला म्हणाली, मी हॉलिवूडमधून फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आले आहे. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्या प्रेमात पडली. ज्याच्या प्रत्युत्तरात सलमान म्हणाला की तू शाहरुख खानबद्दल बोलत आहेस ना?

यावर ती म्हणते- नाही, मी सलमान खानबद्दल बोलत आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? तिनं असं विचारताच तिथल्या सगळ्यानी एकच आवाज केला.

मात्र त्यावर सलमाननंही असं उत्तर दिलं की सगळे थक्कच झाले. लग्नासाठी प्रपोज केल्यानंतर सलमान म्हणाला, "माझ्या लग्नाचे दिवस गेले. तुम्ही मला 20 वर्षांपूर्वी भेटायला हवं होतं." असं म्हणत सलमाननं तिचं मन तोडलं.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरीही खुप प्रतिक्रिया देतांना दिसत आहे. त्यातच सलमानचे चाहते त्याला पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला देखील देत आहेत.

सलमान खानला प्रपोज करणाऱ्या महिलेचं नाव अलिना खलफिह आहे. ती हॉलिवूडची होस्ट आहे. अलीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज पोस्ट शेअर करत असते.

टॅग्स :viralsalman khanVideo