
Salman Khan-Aamir Khan: सलमान खानने आमिर खानला दिली त्याची सर्वात मौल्यवान वस्तू? फोटो व्हायरल
बॉलीवूडचा भाईजान म्हटला जाणारा सलमान खान त्याच्या मैत्रीसाठी ओळखला जातो आणि तो त्याच्या मित्रांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असतो. त्याच्या या दातृत्वामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट, जो आपल्या करिअरच्या वाईट टप्प्यातून जात आहे, त्याला सलमान भाईने त्याचे लकी चार्म ब्रेसलेट दिले.
आमिरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यामध्ये त्याने सलमान खानचे निळ्या रंगाचे ब्रेसलेट हातात घातले आहे. यावर आता सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
त्याचवेळी सलमान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या हातात ब्रेसलेट नव्हते. आमिरकडे हे ब्रेसलेट फक्त एक दिवस राहिले. दुसऱ्या दिवशी सलमानची बहीण अर्पिताच्या घरी ईद पार्टीतून निघताना आमिरच्या हातात ब्रेसलेट नव्हते.
ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच दोघांचे चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. भाईजानने आमिर खानला त्याचे गुड लक चार्म ब्रेसलेट का दिले याबद्दल सलमानचे चाहते खूप नाराज होत आहेत, परंतु सलमान नेहमीच त्याच्या मित्रांच्या मदतीसाठी पुढे येतो आणि आमिरसोबतच्या त्याच्या मैत्रीचे किस्से खूप जुने आहेत.
सलमानने शुक्रवारी रात्री आपल्या इंस्टाग्रामवर आमिर खानसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याच्या चाहत्यांना चांद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.

aamir khan

aamir khan
या ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, या 80 कोटींच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 15.81 कोटींचा व्यवसाय केला आहे.
या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, पूजा हेगडे, जगपती बाबू, राघव जुआल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.