Salman Khan Video: आज सलमानला कळलं असेल बाप होणं म्हणजे काय.. एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan, Salman Khan news, Salman Khan viral video, Salman Khan movies

Salman Khan Video: आज सलमानला कळलं असेल बाप होणं म्हणजे काय.. एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल

Salman Khan Viral Video News:  भाईजान सलमान खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सलमान अनेकदा त्याच्या फॅन्सचं प्रेम स्वीकारताना दिसतो. सलमान खानचा नुकताच एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत सलमानला धावत भेटायला त्याचा एक लहान फॅन आला. त्यावेळी सलमानने केलेल्या खास कृतीने सर्वांचं मन जिंकलं. सलमानचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

(Salman Khan Hugs His Little Fan At Airport, Internet Is In Love)

गुरुवारी पहाटे, 'दबंग' स्टार सलमान त्याच्या छोट्या चाहत्याला भेटला. आणि सलमानला त्या लहान फॅनला मिठी मारली. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक मुलगा मुंबई विमानतळावर सलमानला भेटण्यासाठी धावत असल्याचे दिसत आहे. सलमान चालत असताना त्या मुलाला पाहून थांबला. हा मुलगा येऊन थेट सलमानला बिलगला. आणि त्याने सलमानला पाहून मिठी मारली.

लहान मुलाच्या या कृतीने सलमानच्या चेहऱ्यावर एक प्रचंड हसू आलं. अनेक व्हिडिओत सलमानचे लहान मुलांवरचे बिनशर्त प्रेम स्पष्टपणे दिसून येते.सलमान त्याच्या भाच्यांसोबत सुद्धा वेळ घालवताना दिसतो. या लहान मुलाच्या कृतीने सलमान प्रचंड खुश झाला. सलमानने मुलाच्या गालावर प्रेमाने हात फिरवला. आणि त्याला प्रेमाने निरोप दिला.

वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. सलमान दोन दिवस अबुधाबीमध्ये जातोय. Iifa २०२३ मध्ये सलमान खान परफॉर्मन्स सादर करणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत. हा चित्रपट दिवाळीला हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.