'बिग बॉस १४' मधील पहिला स्पर्धक आणणार शोमध्ये 'जान'? स्पा पासून थिएटरपर्यंत सलमानने दाखवली नव्या गोष्टींची झलक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 25 September 2020

'बिग बॉस १४' चं ग्रँड प्रिमिअर ३ ऑक्टोबरला होणार असलं तरी नुकत्याच ऑनलाईन झालेल्या 'बिग बॉस १४' च्या प्रेस कॉन्फरस दरम्यान पहिल्या स्पर्धकावरुन पडदा हटवण्यात आला आहे.

मुंबई- 'बिग बॉस'च्या १४ व्या सिझनने पहिल्यांदाच एतक्या वर्षांचा नियम मोडला आहे. पहिल्यांदाच बिग बॉसने टेलिकास्ट करत शो लॉन्च करण्याऐवजी सोशल मिडियावर शोच्या लॉन्चची एक झलक दिली आहे. सलमान खानने त्या सुखसोयींची झलक दाखवली ज्या यावेळी स्पर्धकांना नव्याने अनुभवायला मिळणार आहेत. 'बिग बॉस १४'चं ग्रँड प्रिमिअर ३ ऑक्टोबरला होणार आहे त्यादिवशी खुलासा होईल की कोणकोणते सेलिब्रिटी 'बिग बॉस'च्या शोचा भाग असतील. 

व्हिडिओ: अक्षय कुमारसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी हॉटेल बाहेर लावली लांबच लांब रांग  

'बिग बॉस'चं ग्रँड प्रिमिअर ३ ऑक्टोबरला होणार असलं तरी नुकत्याच ऑनलाईन झालेल्या 'बिग बॉस १४' च्या प्रेस कॉन्फरस दरम्यान पहिल्या स्पर्धकावरुन पडदा हटवण्यात आला आहे. बॉलीवूड गायक कुमार सानू यांचा मुलगा जान सानु या सिझनचा पहिला स्पर्धक असणारे. जान सानूचं नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होतं आणि आता तर यावर शिक्कामोर्तब झालं आहे. यावेळी 'बिग बॉस १३'चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला त्याला खास टीप्स देताना दिसून आला.

दुसरीकडे सलमान खानने 'बिग बॉस १४' मध्ये स्पर्धकांना उपभोग घेता येणा-या सुखसोयींची झलक देखील दाखवली आहे. स्पा, थिएटर सारख्या सुखसोयी स्पर्धकांना यावेळी वेगळा अनुभव देतील. यावेळी 'बिग बॉस'मध्ये एक स्पा, एक मॉल, एक थिएटर आणि रेस्टॉरंट असणार आहे.

बिग बॉस मॉल

बिग बॉस स्पा

बिग बॉस रेस्ट्रॉन्ट

बिग बॉस थिअटर

'बिग बॉस १४' यावेळी २०२० ला उत्तर देणार असं म्हणत प्रमोट केलं जात होतं त्यामुळे सलमान खानला याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, 'तुम्ही लॉकडाऊनमध्ये जे काही मिस केलं असेल ते सगळं बिग बॉस १४ मध्ये असेल. स्पर्धकांची इच्छा पूर्ण करण्यात कोणतील कसर सोडण्यात आलेली नाही. स्पर्धकांसाठी हे एक प्रकारे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं असेल. 'बिग बॉस १३' सुपरहिट होतं तेव्हा आशा आहे की यंदाचा सिझनदेखील असाच हिट होईल.' यानंतर सिद्धार्थ शुक्लाने सलमानला अनेक मजेदार प्रश्न विचारले.    

salman khan introduces jaan sanu as first confirmed contestant shows glimpse of spa theatre and other luxuries  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan introduces jaan sanu as first confirmed contestant shows glimpse of spa theatre and other luxuries