Salman-Iulia: सलमानचं गर्लफ्रेंड युलिया वंतूरसोबत 'बर्थ डे सेलिब्रेशन'! |Salman Khan Iulia ventur birthday celebration photo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman-Iulia birthday celebration

Salman-Iulia: सलमानचं गर्लफ्रेंड युलिया वंतूरसोबत 'बर्थ डे सेलिब्रेशन'!

Salman Khan-Iulia vantur: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या विक्षिप्तपणाबद्दल प्रसिद्ध आहे. त्याची शीघ्रकोपीपणा अनेकांना माहिती आहे. त्यामुळे आजवर त्याच्या कित्येक गर्लफ्रेंड त्याच्यावर नाराज असल्याचे दिसुन (Bollywood Bhaijan Salman Khan) आले आहे. सलमानचं डेटिंग हे नेहमीच चर्चेत असणारा विषय असतो. तो जसा त्याच्या रागीट स्वभावाबद्दल ओळखला जातो तसाच तो त्याच्या दिलदारीमुळे देखील अनेकांचा फेव्हरेट आहे. सध्या सलमान त्याच्या नव्या गर्लफ्रेंड युलिया वंतूरच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असल्याचे (Entertainment Trending News) दिसुन आले. सलमाननं नुकतीच युलियानं दिलेली बर्थ डे पार्टी इंजॉय केली.

बॉलीवूडमध्ये रिलेशनशिपबाबत सर्वाधिक चर्चा कुणाची होते तर त्यात पहिलं नाव सलमान खानचं येतं. आतापर्यत सलमान खानचे नाव वेगवेगळ्या (salman iulia news) अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. त्यात ऐश्वर्या रॉय, जॅकलीन फर्नांडिझ, स्नेहा उलाल, झरीन खान, संगीता बिजलानी, कतरिना कैफ आणि आता त्यानंतर युलिया वंतूर. युलिया वंतूर आणि सलमानच्या नावाला सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणवर प्रसिद्धी मिळत असल्याचे दिसून आले आहे. युलियानं आपला 42 वा जन्मदिवस सलमानसोबत साजरा केला आहे.

सलमान कुणाशी लग्न करणार याबाबत काही ज्योतिषांनी त्याच्याच बिग बॉस नावाच्या शोमध्ये भविष्यवाणी केली होती. तो एपिसोड सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय होता. वेगवेगळ्या अॅवार्ड शोमध्ये देखील त्याला लग्नाबद्दल विचारले जाते. मात्र सलमान काहीतरी कारण सांगून त्या प्रश्नाला बगल देत असतो. गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि युलियाच्या रिलेशनशिपवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. त्यावरुन त्यांच्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत.

हेही वाचा: Bollywood च्या ढासळत्या कामगिरीवर फरहान अख्तर स्पष्टच बोलला, म्हणाला...

युलियानं काल तिचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी तिचे नातेवाईक मित्र परिवार उपस्थित होता. त्या बर्थ डे पार्टीमध्ये जेव्हा युलियाची इंट्री झाली तेव्हा त्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळते आहे. युलियानं ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. सलमान आणि युलियाचे फोटो समोर आल्यानंतर मात्र नेटकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. तो म्हणजे काही दिवसांपासून जी चर्चा आहे ती खोटी नाहीतर... सलमाननं युलियाच्या पार्टीत रंग भरल्याच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

हेही वाचा: kamal haasan debt: 'विक्रम'च्या कमाईतून कमल हासन करणार आणखी एक 'विक्रम'

Web Title: Salman Khan Iulia Ventur Birthday Celebration Photo Viral On Social Media Users Funny Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top