Karan-Arjun च्या सेटवर जेव्हा सलमाननं वादा दरम्यान रोखलेली शाहरुखवर बंदूक..थरथरायला लागले होते राकेश रोशन..वाचा किस्सा

सलमान खाननं नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करण-अर्जुन शूट दरम्यानचा हैराण करणारा किस्सा सांगितला आहे.
Karan Arjun memory shared by salman khan
Karan Arjun memory shared by salman khanEsakal

Karan Arjun: बॉलीवूडचा 'भाईजान' म्हणून ओळखला जाणारा सलमान खान आणि किंग खान शाहरुख खान यांनी आतापर्यंत एकत्र अनेक सिनेमांतून काम केलं आहे. दोघांचा एकत्रित काम केलेला पहिला सिनेमा म्हणजे 'करण-अर्जुन'.. जो रिलीज झाला होता १९९५ साली, या सिनेमाला लोकांनी खूप पसंत केलं होतं. पहिल्याच सिनेमापासून शाहरुख आणि सलमानच्या जोडीनं पडद्यावर कमाल केली.

सध्या सलमान आपल्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. यादरम्यान एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने करण-अर्जुन सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे, जेव्हा त्यानं शाहरुख खानला गोळी मारली होती. या घटनेला पाहून राकेश रोशन थरथर कापायला लागले होते. राकेश रोशन यांनी करण-अर्जुन सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.(Salman khan karan arjun movie memory kisi ka bhai kisi ki jaan actor shared memory)

Karan Arjun memory shared by salman khan
Salman Khan: जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच बोलला सलमान खान.. म्हणाला,'मला खरंतर भीती वाटते ती..'

सलमान खाननं सांगितलं की करण-अर्जुनच्या सेटवर पार्टी सुरू होती. तिथे काही डान्सर्स देखील होते. तेवढ्यात सलमाननं तिथल्या लोकांसोबत प्रॅंक करायचा विचार केला. त्यानं शाहरुख सोबत मिळून हा प्लॅन बनवला की तो शाहरुखला डान्स करण्यासाठी बोलावेल पण शाहरुख सारखं त्याला नकार देईल आणि त्यानंतर दोघांमध्ये मारपीट होईल व सलमान त्याच्यावर गोळी झाडेल.

सलमान खानने सिनेमाच्या अॅक्शन डायरेक्टरकडून शूटिंगसाठी वापरली जाणारी ब्लॅक गन मागवली आणि प्लॅनमध्ये ठरल्याप्रमाणे त्यानं आणि शाहरुखनं नाटक केलं. सलमानने शाहरुखला अनेकदा डान्स करण्यासाठी बोलावलं. पण शाहरुख नकार देत राहिला आणि मग त्यानं सलमानचा हात झटकला.मग दोघांत वाद झाला आणि ठरल्याप्रमाणे सलमाननं शाहरुखवर गोळी झाडली,ज्यानंतर शाहरुख जमिनीवर कोसळला.

Karan Arjun memory shared by salman khan
Viral Video: 'काही माहित नाही तर कशाला जातात मंदिरात..', सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला गेलेला सूरज पांचोली ट्रोल
Karan Arjun memory shared by salman khan
Mira Jagannath: मीराचा इजिप्शियन ब्युटी लूक.. पाहून वाढली धाकधूक..

सेटवर त्यावेळी उपस्थित असलेल्यांना शाहरुख-सलमानच्या प्रॅंकविषयी माहित नव्हतं. सगळेच या घटनेला पाहून हैराण झाले. अनेकांना वाटलं की ते देखील आता फसणार यात,त्यामुळे ते तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागले. पण सलमाननं सगळ्यांना धमकी दिली की जो कुणी बाहेर जाईल इथून त्याच्यावर पण तो गोळी झाडेल.

सलमान पुढे म्हणाला की,'' हे सगळं पाहून दिग्दर्शक राकेश रोशनला तरा काहीच सुचत नव्हतं,ते अक्षरशः थरथरत होते. त्यानंतर जेव्हा शाहरुख उठला तेव्हा कळलं की हा प्रॅंक होता आणि मग सगळीकडे हास्याचा कल्लोळ उठला''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com