सलमान खानचा 'भारत' येतोय.. टीझर पाहिला? 

Salman Khan Katrina Kaif starrer Bharat Movie teaser out
Salman Khan Katrina Kaif starrer Bharat Movie teaser out

मुंबई : सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपटाचा टीझर अखेर आज (शुक्रवार) झळकला आहे. 'रेस 3'मधून टीकेला सामोरे जावे लागलेल्या सलमानचा हा नवा चित्रपट याच वर्षी 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

'भारत'मध्ये सलमान खानसह कॅतरिना कैफचीही प्रमुख भूमिका आहे. अली अब्बास जफर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 'भारत'चे संगीत विशाल-शेखर यांचे आहे. सलमान-कॅतरिनाशिवाय या चित्रपटामध्ये तब्बू, दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. 

'भारत'मध्ये मुख्य भूमिकेसाठी प्रियांका चोप्राची निवड झाली होती. पण चित्रिकरणाला सुरवात करण्यापूर्वीच तिने यातून माघार घेतली. तिच्याऐवजी कॅतरिनाला संधी देण्यात आली. 

सलमानचा यापूर्वीचा चित्रपट 'रेस 3' बॉक्‍स ऑफिसवर यशस्वी ठरला असला, तरीही समीक्षक आणि चित्रपटरसिकांनीही त्यावर टीका केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com