सलमान-कतरिना पुन्हा करणार ऍक्‍शन 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि "बार्बी गर्ल' म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. "टायगर जिंदा है' चित्रपटात दोघांना पुन्हा पाहता येणार आहे. सलमान-कतरिनाच्या "एक था टायगर'चा तो सिक्वेल आहे. 15 मार्चला दोघे शूटिंगसाठी ऑस्ट्रियाला जाणारे विमान पकडतील. "टायगर जिंदा है'मध्येही "एक था टायगर'सारखीच धडाकेबाज ऍक्‍शन असणार आहे. हॉलीवूडचा प्रसिद्ध स्टंट मास्टर टॉम स्ट्रदर्स ऑस्ट्रियात दोघांना ऍक्‍शनचे प्रशिक्षण देणार असल्याचे सूत्रांकडून समजते. सलमान आणि कतरिना चित्रपटाची सुरुवात गाण्याने करणार आहेत आणि बर्फात दमदार ऍक्‍शन करताना दिसणार आहेत.

बॉलीवूडचा दबंग खान सलमान आणि "बार्बी गर्ल' म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. "टायगर जिंदा है' चित्रपटात दोघांना पुन्हा पाहता येणार आहे. सलमान-कतरिनाच्या "एक था टायगर'चा तो सिक्वेल आहे. 15 मार्चला दोघे शूटिंगसाठी ऑस्ट्रियाला जाणारे विमान पकडतील. "टायगर जिंदा है'मध्येही "एक था टायगर'सारखीच धडाकेबाज ऍक्‍शन असणार आहे. हॉलीवूडचा प्रसिद्ध स्टंट मास्टर टॉम स्ट्रदर्स ऑस्ट्रियात दोघांना ऍक्‍शनचे प्रशिक्षण देणार असल्याचे सूत्रांकडून समजते. सलमान आणि कतरिना चित्रपटाची सुरुवात गाण्याने करणार आहेत आणि बर्फात दमदार ऍक्‍शन करताना दिसणार आहेत. भारतीय रॉ एजंट अविनाश सिंग राठोडच्या भूमिकेत सलमान आहे. कतरिना पाकिस्तानी आयएसआय एजंट झोयाचा रोल करतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपट दमदार बनवण्यासाठी ऍक्‍शन सीन महत्त्वाचे आहेत. ते जिवंत वाटावेत म्हणून निर्मात्यांनी टॉम स्ट्रदर्सची मदत घेतली आहे. 

Web Title: Salman Khan, Katrina Kaif to start shooting in freezing Austria for Tiger Zinda Hai