धमकी मिळाल्यानंतर कुठे आहे सलमान खान?, सुरक्षेसाठी पोलिसांनी लावलेयत कडक नियम..वाचा सविस्तर Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

Salman Khan: धमकी मिळाल्यानंतर कुठे आहे सलमान खान?, सुरक्षेसाठी पोलिसांनी लावलेयत कडक नियम..वाचा सविस्तर

Salman Khan: बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. ज्यानंतर बान्द्रा येथील सलमान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट भोवती कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड आणि रोहित गर्ग यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. सोबत पोलिसांनी सलमान खानला कोणत्याही आऊटडोअर शूटसाठी किंवा इतर बाहेरील कुठल्याही इव्हेंटसाठी घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.

अर्थात आता तसं पाहिलं तर सलमान खान मुंबईतच नाही आहे. तो आपला आगामी सिनेमा 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Salman Khan not in mumbai police advised not to go outdoor)

सलमान खान सध्या मुंबईत नाही आणि कधी परत येणार याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुरक्षेच्या कारणांना लक्षात घेऊन सलमान सध्या कुठे आहे याबाबतीत गुप्तता पाळण्यात आली आहे.

सलमान सध्या आपला आगामी सिनेमा 'किसी का भाई,किसी की जान' या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त असल्याचं सांगितलं जात आहे. सलमानच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी त्याला कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून,आऊटडोअर शूटला जाण्यापासून किंवा कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटला उपस्थित राहण्यास सक्त मनाई केली आहे.

याव्यतिरिक्त बंदुकधारी सुरक्षा रक्षकांशिवाय सलमाननं घराबाहेर पडू नये असं देखील सांगितलं आहे.

हेही वाचा: अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

सलमानसोबतच सलमानच्या कुटुंबाचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानचे वडील सलीम खान आणि त्याचं पूर्ण कुटूंब सगळेच एकत्र गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यामुळे पोलिसांनी सुऱक्षेच्या कारणास्तव सलमान खानच्या संपूर्ण कुटुंबावरच घराबाहेर न पडण्याची सक्ती आणली आहे.

सलमान खानच्या टीममधील प्रशांत गुंजाळकर याला हा धमकीचा ईमेल आला आहे. हा ईमेल रोहित गर्ग नावाच्या व्यक्तीनं पाठवला आहे. या प्रकरणात रोहित गर्ग,लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराड यांच्या विरोधात केस दाखल केली गेली आहे.

लॉरेन्स बिश्नोईनं याआधी देखील सलमान खानला एका व्हिडीओ मुलाखतीच्या माध्यमातून धमकी दिली आहे. त्यानं अनेकदा सलमान खानला मारण्यासाठी सापळा रचला होता पण त्यात त्याला यश मिळाले नाही. आता या संपूर्ण प्रकरणातील गंभीरता लक्षात घेता मुंबई पोलिसांसोबतच सलमान खानचं संपूर्ण कुटुंबही अलर्ट झालं आहे.