Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: 'किसी का भाई किसी की जान'नं दिला प्रेक्षकांच्या डोक्याला ताप...भन्नाट मीम्स व्हायरल |Salman Khan Pooja Hegde Starring Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Twitter funny memes after watching movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: 'किसी का भाई किसी की जान'नं दिला प्रेक्षकांच्या डोक्याला ताप...भन्नाट मीम्स व्हायरल

सलमान खानचा या वर्षातील बहूप्रतिक्षित चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' हा 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही ईदच्या एक दिवस आधी रिलीज झाला. सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटांची खुपच प्रतिक्षा लागलेली होती.

मात्र, आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर याविषयी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे सलमान खानचे चाहते 'किसी का भाई किसी की जान'ला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत, तर दुसरीकडे चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच ट्विटरवर मीम्सही पाहायला मिळत आहेत.

नुकतच किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी 'किसी का भाई किसी की जान'ला अपेक्षेप्रमाणे चांगली सुरुवात झाली नाही. रिपोर्टनुसार, 'किसी का भाई किसी की जान' ने पहिल्या दिवशी 12.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जरी वास्तविक संग्रह यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो.

बॉक्स ऑफिसवरील या आकड्यावरुनच हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला की नाही याचा अंदाज तुम्हा लावू शकतात. त्यातच आता . दुसरीकडे, चित्रपट पाहिल्यानंतर बहुतेक चाहते खूप निराश दिसत आहेत. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान'मधील डायलॉग्सचीही आणि सीन्सची ट्विटरवर खिल्ली उडवली जात आहे. तसचं हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या ते हे मीम्स पाहिल्यानंतर कळते.

फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात व्यंकटेश, भूमिका चावला, जगपती बाबू, विजेंदर सिंग, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम आणि इतर कलाकार आहेत. साडेतीन वर्षांनंतर सलमान मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.