Bigg Boss 16: मोठी बातमी..! सलमान खानने बिग बॉस सोडला, पुढचा हंगाम होस्ट करणार नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan, bigg boss 16

Bigg Boss 16: मोठी बातमी..! सलमान खानने बिग बॉस सोडला, पुढचा हंगाम होस्ट करणार नाही?

Bigg Boss 16 Salman Khan: बिग बॉसचा १६ वा सिझन काल नुकताच संपला. हा सिझन प्रचंड गाजलाय. बिग बॉस १६ ची कालची ग्रँड फिनाले धुमधडाक्यात रंगली. बिग बॉस १६ चा होस्ट सलमान खानने त्याच्या खास शैलीत बिग बॉसची ग्रँड फिनाले होस्ट केली.

मजा - मस्करी करत, हसत - खेळत, घरातले सदस्य आणि त्यांच्या कुटुंबाशी गप्पा मारत सलमानने ग्रँड फिनाले मध्ये रंगत आणली. पण आता बिग बॉस १६ विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.

(Salman Khan Quits Bigg Boss)

बिग बॉस हिंदी लोकप्रिय होण्यात घरातले सदस्य जितके जबाबदार असतात तितकाच शो चा होस्ट सलमान खानचा सुद्धा मोठा वाटा आहे. सलमानची खास शैली, त्याचा स्वॅग, त्याची मस्ती आणि त्याचा राग बिग बॉसच्या शोला वेगळ्या उंचीवर घेऊन गेलाय.

प्रत्येक सिझन सलमान खान त्याच्या जबरदस्त होस्टिंगमुळे बिग बॉसच्या शोला एका वेगळया उंचीवर घेऊन जातो. पण आता सलमान खान बिग बॉस सोडणार असल्याची चर्चा आहे.

बिग बॉसच्या चौथ्या सिझनपासून सलमान खान बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारत आहे. बिग बॉस १६ चा समावेश करता सलमानने आजवर बिग बॉसचे १२ सिझन होस्ट केले आहेत.

पण आता सलमान बिग बॉसचा पुढचा हंगाम होस्ट करणार नाही. याचं कारण म्हणजे काल बिग बॉस १६ संपताना सलमानने प्रेक्षकांचा निरोप घेतला नाही. याशिवाय भेटूया आता पुढच्या सिझनमध्ये असंही काही सलमान म्हणाला नाही.

प्रत्येक सिझनच्या अखेरीस सलमान प्रेक्षकांचा खास निरोप घेत असतो. पण या सिझनला विजेता घोषित झाल्यावर सलमानने असा कोणताही निरोप घेतला नाही. त्यामुळे सलमानने १६ व्या सिझननंतर बिग बॉस शो सोडला असून सलमान आता बिग बॉसचा पुढचा सिझन होस्ट करणार नाही, अशी जोरदार चर्चा आहे.

पुढच्या सिझनला सलमान नसेल तर त्याच्या तोडीचा अभिनेता सूत्रसंचालक म्हणून उभा करण्यासाठी निर्मात्यांची तारेवरची कसरत होणार यात शंका नाही. एम. सी. स्टॅन बिग बॉसच्या १६ व्या सिझनचा विजेता ठरला

टॅग्स :Big Bosssalman khan