'भारत' मध्ये दिसेल पुन्हा एकदा सलमान-प्रियंकाची केमिस्ट्री 

बुधवार, 18 एप्रिल 2018

आता पुन्हा एकदा या सलमान-प्रियंकाची केमिस्ट्री 'भारत' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान व पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्रा तब्बल दहा वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. या दोघांनी 'गॉड तुस्सी ग्रे हो', 'मुझसे शादी करोगी' आणि त्यानंतर 'सलाम-ए-इश्‍क'मध्ये काम केलं होतं आणि यातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावलीही होती.

salman-priyanka

आता पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री 'भारत' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी 'भारत'च्या चित्रीकरणाला सुरवात केली असल्याची माहिती ट्विटरवर फोटो शेअर करून दिलीय.

प्रियंका 'भारत'च्या शूटींगसाठी जुलैमध्ये सुरवात करणार आहे. पुन्हा एकदा सलमानसोबत काम करण्यासाठी प्रियंका खूप उत्सुक असून त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्याचं ती सांगते आणि ती या चित्रपटाच्या शूटींगची वाट पाहतेय. या दोघांचे चाहते त्यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 
salman-priyanka

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Salman Khan Romance With Priyanka Chopre In Bharat Movie