Tiger 3: भाग टायगर भाग! आता Tiger ला वाचवण्यासाठी 'पठाण' येणार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Shah Rukh Khan In Tiger 3

Tiger 3: भाग टायगर भाग! आता Tiger ला वाचवण्यासाठी 'पठाण' येणार..

Salman Khan Shah Rukh Khan In Tiger 3: शाहरुख खानचा पठाण बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला आणि अजुनही हा चित्रपट धमाकेदार कमाई करत आहेत. हा चित्रपट जरी शाहरुखचा होता मात्र यात सलमाच्या कॅमिओ रोलची चर्चाही चांगलीच रंगली.

सलमानने काही मिनिटासाठी चित्रपटात आला मात्र सगळी हवाच केली. आता सलमानच्या चाहत्यांना त्याच्या बहू प्रतिक्षीत चित्रपट टायगर 3ची प्रतिक्षा आहे. सलमान खानही सध्या 'टायगर 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपट यावर्षी 10 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा एक व्हिडिओही लिक झाला होता. आता त्यातच 'टायगर 3' बद्दल असं बोललं जात होतं की या चित्रपटात शाहरुख खानचाही कॅमिओ असणार आहे.

'पठाण'मधला सलमान खानचा कॅमिओ खूप गाजला होता. पण आता सलमान खानच्या 'टायगर 3'मध्ये 'पठाण'च्या याच सीनची पुनरावृत्ती होणार असून त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टीही पाहायला मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानही सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, सलमान खान आणि शाहरुख खान 'टायगर 3'च्या सिक्वेन्ससाठी 7 दिवस एकत्र शूट करणार आहेत.

एका बॉलिवुड वेबसाईटनुसार सांगितले जात आहे की, टायगर 3 मध्येही 'पठाण'च्या त्या सीनची पुनरावृत्ती होऊ शकते. मात्र, 'पठाण'ला मिळालेल्या कौतुकानंतर निर्मात्यांनी तो सीन थोडा बदल करून 'टायगर 3'मध्ये सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच चित्रपटात शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या स्क्रीन टायमिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे, त्यासोबतच आणखी अनेक मजेदार सीन्स देखील जोडण्यात आले आहेत.

'टायगर 3'चे शूटिंग जवळपास संपले असले तरी, निर्मात्यांनी सलमान खान आणि शाहरुख खानचे सीन शूट करण्यासाठी 'पठाण' रिलीज होण्याची वाट पाहिली. कारण त्यांना 'पठाण' चित्रपटातील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहायच्या होत्या. मात्र पठाणमधील शाहरुख आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि त्यामुळेच आता टायगर 3 मध्ये दोघांची जोडी पुन्हा धमाल करण्यासाठी सज्ज आहे.