सलमान खान 'या' दिवशी करणार 'बिग बॉस १४' च्या स्पर्धकांची घरात एंट्री

bigg boss 14
bigg boss 14

मुंबई- बिग बॉस १४ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोचा होस्ट असलेला सलमान खान आणि या शोमधील वेगवेगळ्या खेळांमुळे, गॉसिपमुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. यावर्षी लॉकडाऊनमुळे बिग बॉस उशीरा सुरु होणार होतं. मात्र बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये नाही तर यावर्षी त्याच्याही आधी म्हणजेच सप्टेंबरमध्ये हा शो सुरु होणार असल्याचं कळतंय.

बिग बॉस १४ची सुरुवात २० सप्टंबरला होणार आहे. असं म्हटलं जातंय की एका मोठ्या सोहळ्या दरम्यान या शोचा होस्ट असलेला सलमान खान स्पर्धकांना त्यांच्या सादरीकरणासोबत घरातमध्ये एंट्री देणार आहे. इतकंच नाही तर यंदाची घराची थीम जंगलाची असणार असल्याची देखील चर्चा आहे. शोच्या नियमांमध्ये आणि खेळांमध्ये देखील अनेक बदल पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त स्पर्धकांना रेस्टॉरंट, हॉटेल, जीम आणि बाजार यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचं कळतंय. 

या शोच्या बाबतीत अजुन अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे नियमांचं पालन करत सगळ्या रिऍलिटी शोमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यामुळेच बिग बॉस देखील यावर्षी उशीरा सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. 

जर सुत्रांकडून मिळालेली ही माहिती खरी ठरली तर प्रेक्षकांसाठी मोठी खुशखबर असेल यात शंका नाही. यंदाच्या सीजनमध्ये स्पर्धक म्हणून करण कुंद्रा, निया वर्मा, विवियन डिसेना, सुरभि ज्योती, राजीव सैन, जैस्मिन भसीन, नेहा शर्मा, आलिशा पंवर आणि मानसी श्रीवास्तव यांसारखे कलाकार चर्चेमध्ये आहेत.   

salman khan show bigg boss season 14 to premiere on september  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com