
Salman Khan Viral Video: अखेर सलमानचं वय दिसलं.. 'म्हातारा' म्हणत चाहत्यानंच दाखवला आरसा..
Salman Khan: सलमान खान नुकताच बान्द्रयात एका क्लिनिक बाहेर दिसला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर लगोलग व्हायरल झाले. पण ते पाहिल्यावर लोक मात्र हैराण झाले आहेत.
या फोटोत सलमान खान जसा नेहमी डॅशिंग दिसतो तसा मुळीच दिसत नाहीय.सलमान खानचे हे फोटो पाहून त्याचे चाहते मात्र चिंतेत पडले आहेत. आणि त्यांना जाणून घ्यायचं आहे की आपल्या लाडक्या स्टारला नक्की झालं काय आहे.(Salman Khan spotted at bandra clinic video viral fans comment mera heri buddha ho gaya)
सलमानच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसतेय..तर त्याची वाढलेली दाढी तो आजारी असल्याचा भास करवतेय. माहिती समोर येतेय की, सलमान बान्द्र्यात एका क्लीनिकमध्ये गेला होता. पण तो तिथे कशासाठी गेला होता याविषयी काही कळालेलं नाही. पण अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत..ज्यांना पाहून चाहते हैराण झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी 'पठाण' सिनेमात सलमान शाहरुख सोबत कॅमियो साकारताना दिसला होता. तेव्हा त्याला आणि शाहरुखला एकत्र पाहून चाहते भलतेच खूश झाले होते. पण आता या क्लिनिकमध्ये पोहोचलेल्या थकल्या-भागल्या सलमानला पाहून चाहत्यांची चिंता वाढली अन् त्यांनी त्या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स द्यायला सुरुवात केली.

Salman Khan Viral Video-Fan comments
काही लोकांनी सलमानची झलक दिसली म्हणून आनंद व्यक्त केला तर एका युजरनं त्या व्हिडीओमागचा खुलासा करत म्हटलं की माझ्या समोरून गाडी गेली..तो जीम ओपनिंग साठी गेला होता,क्लिनकला नाही.
तर एकानं मजेदार स्टाईलमध्ये लिहिलं--'टायगर रस्त्यावर...',कुणी लिहिलं-'भाईचा जलवा...'. पण सलमानचा हा लूक पाहून एका नेटकऱ्यानं चक्क लिहिलं- 'माझा हिरो म्हातारा झाला...'हे त्याचं डेरिंगच म्हणायचं. कारण सलमानला पब्लिक प्लॅटफॉर्मवर म्हातारा म्हणणारा हा गडी पहिलाच आहे बहुधा.
सलमान खानच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर लवकरच तो 'किसी का भाई,किसी की जान' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाला फरहाद सामजीनं दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमात पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
याव्यतिरिक्त शहनाझ गिल,पलक तिवारी,सिद्धार्थ निगम,व्यंकटेश दग्गुबाती,अभिमन्यु सिंग,राघव जुयाल असे कलाकारही आहेत. सलमानचा 'टायगर ३' च्या प्रतिक्षेतही चाहते आहेत. या सिनेमात कतरिना कैफ,इमरान हाश्मी दिसतील.