ट्युबलाइट चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये दाखल

टीम इ सकाळ
शुक्रवार, 30 जून 2017

सलमान खानचा ट्युबलाइट हा चित्रपट आठवडाभराने का असेना परंतु 100 कोटी क्लबमध्ये दाखल झाला आहे. या सिनेमाची झालेली हवा आणि भारतभरातून या चित्रपटाला मिळालेली चित्रपटगृहे पाहता पहिल्या तीन दिवसांतच या क्लबमध्ये सिनेमा जाईल असा विश्वास अभ्यासकांनी वर्तवलाा होता. पण ही ईद सलमानसाठी तितकी सोपी गेली नाही. 

मुंबई : सलमान खानचा ट्युबलाइट हा चित्रपट आठवडाभराने का असेना परंतु 100 कोटी क्लबमध्ये दाखल झाला आहे. या सिनेमाची झालेली हवा आणि भारतभरातून या चित्रपटाला मिळालेली चित्रपटगृहे पाहता पहिल्या तीन दिवसांतच या क्लबमध्ये सिनेमा जाईल असा विश्वास अभ्यासकांनी वर्तवलाा होता. पण ही ईद सलमानसाठी तितकी सोपी गेली नाही. 

शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीनही दिवस सिनेमाने साधारण 21 ते 23 कोटींमध्येच गल्ला जमवला. त्यानंतर मात्र ही कमाई 10 कोटीच्या आत होती. शुक्रवारी दुपारी या सिनेमाने 100 कोटींचा गल्ला जमवला. ट़्युबलाइटच्या निर्मात्यांनी आज दुपारी या बाबीची अधिकृत घोषणा केली. 

Web Title: salman khan tubelight club esakal news

टॅग्स