Salman Khan : खूब भालो! सलमाननं ममता दीदींची भेट का घेतली? अर्धा तास झाली चर्चा

सलमाननं आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.
Salman Khan
Salman Khan

Salman Khan meet Mamata Banerjee : बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. सलमानला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठी काळजी आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्या घराभोवती बंदोबस्त ठेवला आहे. सलमान खानचा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला किसी का भाई किसी की जान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.

सलमाननं आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे. सलमाननं ममता दीदींची भेट घेण्याचे कारण काय, असा प्रश्न तो फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आला आहे. यापूर्वी सलमानं अनेक राजकारण्यांची भेट घेतली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सलमान खान यांचा व्हायरल झालेला तो फोटो चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Salman Khan meet Mamata Banerjee
Salman Khan meet Mamata Banerjee

सलमान खान आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर तो पश्चिम बंगालमध्ये असणाऱ्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली हे अजून समोर आलेले नाही. सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ममता दीदी चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं देखील पश्चिम बंगाल सरकारला या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध का आहे अशी विचारणा केली आहे.

Salman Khan
The Kerala Story : पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये बंदी, अमेरिका-कॅनडामध्ये झाला प्रदर्शित!

सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा बॉलीवूडच्या या दोन्ही सेलिब्रेटींनी पश्चिम बंगालमधील इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. सलमाननं कडेकोट सुरक्षारक्षकांच्या समवेत ममता दीदींची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याला मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. त्याला बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

सलमान खान हा तेरा वर्षानंतर कोलकात्याला गेला आहे. यापूर्वी तो त्याच्या वॉटेंड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. त्यानंतर आता तो 'Da-Bangg द टूर रीलोडेड' मध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. सलमानचा हा शो गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये होत असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिाद मिळतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com