'भारत'मध्ये कॅटरीना कैफची एन्ट्री

Salman Khans Heroine In Bharat Is Katrina Kaif Replaces Priyanka Chopra
Salman Khans Heroine In Bharat Is Katrina Kaif Replaces Priyanka Chopra

सलमान खान अभिनित 'भारत' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. प्रियंका चोप्रा या सिनेमाची प्रमुख नायिका होती. पण प्रियंका लवकरच सिंगर निक जोनस सोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. म्हणून तिने 'भारत'ला रामराम ठोकला आहे. प्रियंकाने सिनेमा सोडल्याची खबर सिनेमाचे दिग्दर्शक अली अबास जफर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली होती. 

प्रियंकाने सिनेमातून एक्झिट घेतल्यानंतर सलमानच्या नायिकेच्या भुमिकेत कोण असणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण हा प्रश्न आता सुटला आहे. कारण 'भारत'साठी सलमान खानची नायिका म्हणून कॅटरीना कैफचं नाव पक्कं झालं आहे. मैने प्यार क्यु किया, पार्टनर ते टायगर जिंदा है पर्यंत सलमान-कॅटरीना या जोडीने अनेक हिट्स दिले आहेत. 'भारत'मध्ये ही जोडी काय धमाका करेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

सिनेमाचे दिग्दर्शक अली यांनी दोन दिवसांपुर्वी 'भारत'मध्ये प्रियंकाच्या जागी सिनेमाच्या लीडींग लेडीचे नाव लवकरच घोषित करु असे ट्विट केले होते. 
 



आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com