Radhe : सलमानचा 'हायब्रिड रिलीज मॉडेल' यशस्वी ठरणार का?

'राधे'च्या प्रदर्शनासाठी सलमानने निवडला अनोखा मार्ग
Radhe poster
Radhe posterinstagram

अभिनेता सलमान खानचा Salman Khan 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe Your Most Wanted Bhai हा चित्रपट आज (१३ मे) प्रदर्शित होतोय. हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रेक्षकांना पाहता यावा यासाठी सलमान आणि चित्रपटाच्या टीमने खूप प्रतीक्षा केली. मात्र कोरोनामुळे परिस्थिती अजूनही आटोक्यात नसल्याने अखेर सलमानने प्रदर्शनाचा मध्यम मार्ग काढला. सलमानने 'राधे'साठी 'हायब्रिड रिलीज'चा पर्याय स्वीकारला आणि सध्या त्याचीच इंडस्ट्रीमध्ये चर्चा होतेय. 'झी एंटरटेन्मेंट एंटरप्राइझेस लिमिटेड'कडून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं जातंय. कारण मोजके थिएटर्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म झीवर हा चित्रपट एकत्रित प्रदर्शित केला जाणार आहे. म्हणूनच याला 'हायब्रिड रिलीज' म्हटलं जातंय. पण ओटीटीवर हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना थिएटरप्रमाणेच तिकिटाचे पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी 'विशेष राधे कॉम्बो ऑफर'सुद्धा देण्यात येत आहे. या ऑफरअंतर्गत 'राधे'चा चित्रपट पाहणाऱ्यांना ZEE5 चं वर्षभराचं सबस्क्रीप्शन ४९९ रुपयांना मिळणार आहे. या वर्षभराच्या सबस्क्रीप्शनची मूळ किंमत ही ९९९ रुपये इतकी आहे. ओटीटीवर 'राधे' पाहण्यासाठी प्रेक्षकांना २४९ रुपये भरावे लागणार आहेत. (salman khans hybrid release model for radhe movie how it works and will it be successful)

हायब्रिड रिलीजसाठी मल्टिप्लेक्सचा होता विरोध

सलमानचा चित्रपट म्हणजे थिएटर्स मालकांसाठी पैसे कमावण्याची मोठी संधी असते. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या सलमानचा चित्रपट पाहण्याासाठी प्रेक्षक थिएटर्समध्ये तुफान गर्दी करतात. पण यावेळी थिएटर्स मालकांना त्यांचा नफा कमावता येणार नाही. याबद्दल खुद्द सलमाननेही त्यांची माफी मागितली होती. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि अनिश्चितता पाहता तयार झालेले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांवर दबाव टाकल्याने 'हायब्रिड रिलीज'चा मार्ग निवडावा लागला, असं सिनेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हेही वाचा : कधी, कुठे आणि कसं पाहू शकता सलमानचा 'राधे' चित्रपट?

'सलमान खानच्या चित्रपट प्रदर्शनासाठी आम्ही सबस्क्रीप्शनचा नवीन पर्याय प्रेक्षकांना दिला आहे. हा चित्रपट ५० हून अधिक थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे आणि झी5वर वर्षभरासाठी ४० शोज शेड्युल करण्यात आले आहेत. अशा एकत्रित रिलीजमुळे आम्हाला नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल देशभरात ओटीटीचं जाळंही विस्तारता येईल,' असं झी5 चे मुख्य व्यवसाय अधिकारी मनिष कालरा 'लाइव्ह मिंट'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

कोरोना महामारी आणि लॉकडाउन यांचा चित्रपटसृष्टीलाही मोठा फटका बसला आहे. अशावेळी अगदीच तोटा होऊ नये यासाठी प्रदर्शनासाठी निवडलेला सलमानचा हा मार्ग यशस्वी ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com