esakal | दिग्गजांसोबत सलमानच्या पेंटिंगचं प्रदर्शन; अशा पद्धतीने मानले आभार

बोलून बातमी शोधा

salman khan}

कला प्रदर्शनात सलमानच्या पेंटिंगला मिळालं स्थान

दिग्गजांसोबत सलमानच्या पेंटिंगचं प्रदर्शन; अशा पद्धतीने मानले आभार
sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

अनेक बॉलिवूड कलाकार अभिनयाव्यतिरिक्त इतर कला आत्मसात करतात. काहींना गाण्याची आवड असते तर काहींना वादनाची आवड असते. अशीच एक आवड बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान जोपासतो. सलमानला चित्रकलेची फार आवड आहे. त्याच्या चित्रकलेच्या कौशल्याचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सलमानला पेंटिंग प्रमाणेच गाण्याचीही आवड आहे. गायनासोबतच त्याच्या चित्रकलेचंही नेटकऱ्यांनी अनेकदा कौतुक केलंय. 

नुकताच सलामानने एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पोस्टर बेंगळुरुमधील कलाप्रदर्शनाचे आहे. 'विचित्र, उदास, अभिमान आणि आनंद अशा सर्व भावना सध्या मला जाणवत आहेत. माझं काम इतक्या मोठ्या दिग्गज राजा रवि वर्मा, अबनिंद्रनाथ टागोर आणि व्ही. एस. गायतोंडे यांच्यासोबत लावलं जाणार आहे. हा सन्मान देण्यासाठी मनापासून आभार, असं कॅप्शन सलमानने या पोस्टरला दिलं आहे. या कला प्रदर्शनात सलमानचे एक चित्र ठेवण्यात आले आहे. हे चित्र मदर तेरेसा यांच्यावर आधीरित आहे. चित्रावर सलमानने स्वाक्षरी केली आहे. 

हेही वाचा : 'बाबो! ही तर ऐश्वर्याच'; पाकिस्तानच्या आमानाला पाहून नेटकरी थक्क!

बेंगळुरूमधील या कलाप्रदर्शनाचं आयोजन गुगल आर्ट अँड कल्चर यांनी केले आहे. हे प्रदर्शन २७ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात अनेक दिग्गजांचे चित्र ठेवण्यात आले आहेत. जुन्या आणि नव्या कलाकारांच्या चित्रांचे हे प्रदर्शन असणार आहे.