आथियाचे सलमान सर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

आथिया शेट्टीने हिरो चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा सध्या "मुबारकां' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे; पण तिला कोणत्या खानबरोबर काम करणार असं विचारलं तर तिचं पहिलं प्राधान्य सलमान खानला असणार आहे.

असं ती म्हणते, "सलमानबरोबर काम करण्यासाठी मला खूप काही शिकायची गरज आहे. हिरोमध्ये माझा जर सलमानबरोबर एखादा सीन असता तर मला तो सीन देताच आला नसता. कारण मी ते समोर आल्यावरच सगळे डायलॉग विसरून त्यांच्याकडेच बघत बसले असते.' तिचं असंही म्हणणं आहे की, सलमानबरोबर काम करण्यासाठी मी अजून तयार नाही.

कारण मला स्वतःला खूप शिकायचं आहे आणि ते मी शिकेन तेव्हा सलमान सर माझ्याबरोबर काम करायला तयार होतील. ते मला अथिया मॅडम म्हणतात. कारण मी त्यांना सर म्हणते.'  
 
Web Title: Salman Sir says athiya