दबंग ३ मध्ये सलमान-सुदीपचा ॲक्‍शनवॉर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

 सलमान खानच्या बहुचर्चित ‘दबंग ३’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘दबंग’ सीरिजची खासियत म्हणजे यामधील खलनायक तितकाच दमदार असतो.

मुंबई : सलमान खानच्या बहुचर्चित ‘दबंग ३’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘दबंग’ सीरिजची खासियत म्हणजे यामधील खलनायक तितकाच दमदार असतो. या  चित्रपटाच्या तिसऱ्या भागातील खलनायकही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. साऊथ स्टार किच्छा सुदीप या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. 

चित्रपटात सलमान-सुदीपचा ॲक्‍शनवॉर प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. सुदीप या चित्रपटात बाली हे पात्र साकारत आहे; तर बॉलीवूडचा चुलबुल पांडे म्हणजे सल्लुमियाँ बालीशी दोन हात करताना या चित्रपटात दिसणार आहे. ‘दबंग ३’मध्ये ॲक्‍शन सीन्सवर अधिक भर देण्यात आला आहे. या ख्रिसमसला बॉक्‍स ऑफिसवर सल्लुमियाँच्याच चित्रपटाचा बोलबाला असण्याची शक्यता आहे. 

web title : Salman-Sudeep's action-adventure in Dabangg 3


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman-Sudeep's action-adventure in Dabangg 3