सलमानचा 'सुलतान' तीनशे कोटींच्या पुढे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली- बॉलिवुडचा लोकप्रिय ‘दबंग‘ अभिनेता सलमान खान याने पुन्हा एकदा अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यावर आपलं विशेष स्थान कायम असल्याचे सिद्ध केलं आहे. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेला ‘सुलतान‘ बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करीत तीनशे कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. 

अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केलेल्या सुलतानला चाहत्यांची दाद मिळत असल्याने तो नवे विक्रम रचत आहे. 

सुलतान या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर वाहवा मिळाली. याशिवाय चाहत्यांनी सुलतान पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल गर्दी केल्याने कमाईही चांगलीच झाली. बॉक्स ऑफिसवर त्याचा प्रभाव दिसत आहे. 

Web Title: Salman 'Sultan' in front of three hundred million