पुढच्या वर्षी ईदला "दबंग 3' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

बॉलीवूडचा दबंग खान ऊर्फ सलमान खानचे या वर्षी "ट्युबलाइट' व "टायगर जिंदा है' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानंतर तो "दबंग 3' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. जानेवारी 2018 ला शूटिंगला सुरुवात करणार आहे. "दबंग'चा निर्माता व "दबंग 2'चा दिग्दर्शक अरबाज खानला "दबंग 3' चित्रपटाची कल्पना सुचली आहे. सध्या अरबाज स्वित्झर्लंडला स्क्रीप्ट पूर्ण करतो आहे. आणि तिथेच तो चित्रीकरणासाठी ठिकाणही शोधत आहे. या चित्रपटासाठी नायिकेची निवड अजून झालेली नाही; मात्र सलमान चुलबुल पांडेचा रोल साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

बॉलीवूडचा दबंग खान ऊर्फ सलमान खानचे या वर्षी "ट्युबलाइट' व "टायगर जिंदा है' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानंतर तो "दबंग 3' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. जानेवारी 2018 ला शूटिंगला सुरुवात करणार आहे. "दबंग'चा निर्माता व "दबंग 2'चा दिग्दर्शक अरबाज खानला "दबंग 3' चित्रपटाची कल्पना सुचली आहे. सध्या अरबाज स्वित्झर्लंडला स्क्रीप्ट पूर्ण करतो आहे. आणि तिथेच तो चित्रीकरणासाठी ठिकाणही शोधत आहे. या चित्रपटासाठी नायिकेची निवड अजून झालेली नाही; मात्र सलमान चुलबुल पांडेचा रोल साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. या वर्षी ईदला "ट्युबलाइट' आणि डिसेंबरला "टायगर जिंदा है' हे चित्रपट प्रदर्शित होतील. त्याशिवाय दबंग खान काही चित्रपट निर्मितीचा विचार करीत असून, त्यातील एका चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिस यांना फायनल करण्यात आलंय; मात्र सध्या तरी "दबंग 3'साठी नायिकेचा शोध सुरू आहे. 

Web Title: Salman's Dabangg 3 to roll in January 2018