esakal | नाट्य परिषदेच्या विश्वस्तपदी सामंत, जोशी, हांडे, गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नाट्य परिषदेच्या विश्वस्तपदी सामंत, जोशी, हांडे, गांधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रिक्त असलेल्या विश्वस्तपदावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अभिनेते मोहन जोशी, नाट्यदिग्दर्शक अशोक हांडे आणि गिरीश गांधी यांची बहुमताने निवड झाली.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या दोन गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता. ६) झालेल्या सभेस हजेरी लावल्याने मानापमानाचा अंक संपुष्टात येण्याची आशा निर्माण झाली आहे. आज झालेल्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, शशी प्रभू उपस्थित होते. तसेच पवार यांच्या खास निमंत्रणावरून महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली. नियामक मंडळाच्या सभेस ५९ पैकी ४१ सदस्य हजर होते. तर सात सदस्यांनी पत्राद्वारे आपला पाठिंबा कळवला होता. दिवाळीनंतर पुढील बैठक घेऊन पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: 'जरंडेश्वर'ची पवार कुटुंबीयांकडून पळवा-पळवी करून लपवा छपवी'

पवार यांचे मदतीचे आश्वासन या सभेत विश्वस्त शरद पवार यांनी नाट्य परिषदेला महत्त्वपूर्ण योजना राबवता याव्यात, नाट्य परिषदेच्या संकुल दुरुस्तीसाठी, नाट्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी तसेच शाखांच्या सक्षमीकरणासाठी मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

loading image
go to top