बापरे ! साऊथची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करते एकावेळी १०८ सूर्यनमस्कार, चाहत्यांमध्ये आहे तिच्या सौंदर्याची जबरदस्त क्रेझ

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 14 September 2020

एका साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या फिटनेसचा खुलासा केला आहे. तिने तिचं सगळ्यात महत्वाचं सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

मुंबई- सिनेसृष्टीतल्या प्रत्येक अभिनेत्रीचा एक फिटनेस फंडा असतो. या फिटनेसमुळे केवळ त्यांचं शरिर निरोगी राहत नाही तर त्यांच्या सौंदर्यामध्येही भर पडते. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ते काय खातात? कसे फिट राहतात? त्यांचं ब्युटी सिक्रेट काय आहे? असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात असतात. नुकत्याच अशा एका साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या फिटनेसचा खुलासा केला आहे. तिने तिचं सगळ्यात महत्वाचं सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

हे ही वाचा: ठरलं! 'या' दिवशी होणार बिग बॉस १४चं टेलिकास्ट, सलमान खानचा नवीन प्रोमो आऊट

फिटनेस, सौंदर्य आणि चुलबुल्या अंदाजामुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेली साऊथची अभिनेत्री समंथा अक्किनेनी नेहमीच तिच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. आता तर समंथाने असा खुलासा केला आहे जे ऐकून तुम्हाला चक्कर येईल.समंथा एकावेळी १०८ सूर्यनमस्कार करते ही गोष्ट तिने तिच्या सोशल मिडियावरुन सांगितली आहे. समंथा सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते.

नुकताच तिने एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती ग्रे टॉपमध्ये रिलॅक्स अवतारात दिसतेय. हा फोटो शेअर करताना तिने लिहिलंय, 'विकेंडची उत्तम सुरुवात, १०८ सुर्यनमस्कार.' समंथाचा हो फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या पोस्टमुळे चाहत्यांना तिचं फिटनेस सिक्रेट देखील कळालं आहे. 

या पोस्टवर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत असून तिच्या फिटनेसचं आणि एनर्जीचं कौतुक करत आहेत.समंथा नुकतीच तिच्या वेगवेगळ्या क्लासी लूकमध्ये राणा दगुबत्तीच्या लग्नात दिसून आली होती. समंथा नागार्जुन अक्किनेनी यांची सून आणि अभिनेता नागा चैतन्यची पत्नी असण्यासोबतंच उत्तम अभिनेत्री आहे.    

samantha akkineni reveal she does 108 surya namaskar  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samantha akkineni reveal she does 108 surya namaskar