अभिनेत्री समंथा अक्किनेनीने रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खानसाठी का लिहिलं सॉरी?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 15 September 2020

चौकशीमध्ये रियाने २५ बॉलीवूड सेलिब्रिटींची नावं घेतली जे ड्रग्सचा वापर करत होते. या सेलिब्रिटींमध्ये सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्या नावाची चर्चा होती.

मुंबई-  सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग चॅट उघडकीस आल्यानंतर एनसीबीने मोठ्या चौकशीनंतर रिया चक्रवर्तीला अटक केली. एनसीबीने ड्रग्सची देवाण-घेवाण करण्यावरुन रियाचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा आणि दिपश सावंतसोबत आणखी दोन ड्रग पेडलर्सला देखील अटक केली. रिपोर्ट्सनुसार, चौकशीमध्ये रियाने २५ बॉलीवूड सेलिब्रिटींची नावं घेतली जे ड्रग्सचा वापर करत होते. या सेलिब्रिटींमध्ये सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्या नावाची चर्चा होती.

हे ही वाचा: स्वतःच्या निधनावर अनुराग कश्यप म्हणाले, 'यमराजांनी स्वतः घरी परत आणून सोडलं'

एनसीबीचे डिरेक्टर केपीएस मल्होत्रा यांना ही बातमी फेटाळून लावली आणि म्हटलं की त्यांच्या एजंसीने अशा कोणत्याही बॉलीवूड सेलिब्रिटींची यादी बनवलेली नाही. यावर आता अनेक सेलिब्रिटींच्या रिऍक्शन समोर येत आहेत. यामध्ये साऊथची अभिनेत्री समंथा अक्किनेनी देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. समंथाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तिने तिचं मत मांडलं आहे. यात तिने रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खानची माफी मागितली आहे.

insta

माफी मागण्याचं कारण म्हणजे या फेक रिपोर्ट्समुळे सारा आणि रकुल यांना मोठ्या प्रमाणावर टिकेचा सामना करावा लागला आहे. सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंहला सोशल मिडियावर ड्रग प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातं होतं. मात्र एनसीबीच्या डायरेक्टरनी स्पष्ट केलं की त्यांच्या टीमने केवळ ड्रग पेडलर्सच्या नावांची लिस्ट बनवली आहे यामध्ये कोणत्याही सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश नाहीये.   

samantha akkineni writes for rakul preet singh and sara ali khan  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samantha akkineni writes for rakul preet singh and sara ali khan