
दरवेळी गोंडस मुलीसारखं कसं दिसायचं, त्याचा आला कंटाळा...
अभिमेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नुकत्याच झालेल्या वेब शोमध्ये मनोज बाजपेयीसोबत (Manoj Bajpayee) दिसली होती. तिचे यामधील ग्रे कॅरॅक्टर चर्चेचा मुद्दा बनला होता. साऊथचा ही स्टार हिंदी चित्रपटसृष्टीत (Bollywood industry) पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
दक्षिणेत भरभराटीच्या कारकीर्दीसह, तिने आता बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. समंथा म्हणते, ''मी वेब सीरिज (Web series) करेन असं कधीच वाटलं नव्हतं, पण राज निदिमोरू (Raj Nidimoru) आणि कृष्णा डीकेच्या (Krishna DK) शोमुळे ते बदललं. मी आता कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही असे ठरवले आहे. मला आजपर्यंत अपेक्षेपेक्षा जास्त कौतुक मिळालेले आहे. मला वाटते की आता नवीन आव्हाने स्वीकारण्याचा माझ्यात आत्मविश्वास आला आहे.''

Samantha Ruth Prabhu
बॉलीवूडपासून इतके दिवस अंतर का ठेवले असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणते, ''मी दक्षिणेत माझे स्थान निर्माण केले आहे आणि गेल्या दोन वर्षांतच माझ्या कामात माझा आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. मी अजूनही वाईट प्रोजेक्टस् ची निवड करत होते आणि मला समाधान देणारे काम करत नव्हते. गेल्या दोन वर्षांत खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी बदलल्या आहेत आणि आता, मला आव्हाने स्वीकारण्याबद्दल आत्मविश्वास आला आहे. दुसर्या आव्हानाकडे जाण्यापूर्वी मी सहसा काहीतरी परिपूर्ण करण्यासाठी वेळ घेते. म्हणूनच मला इथपर्यंत पोहोचायला इतका वेळ लागला आहे.''
नंतर ती म्हणते की, ''मला वाटते की कलाकार होण्यासाठी ही एक उत्तम वेळ आहे. सध्या गोष्टी अस्पष्ट आहेत आणि संधी खूप जास्त आहेत. आपण आता ज्या ठिकाणी आहोत ते मला आवडते, आणि इतर उद्योगातील कलाकारांसाठी देखील हे प्रोत्साहन बनले आहे.''
हेही वाचा: 2022 मध्ये दिसणार कतरिना कैफचे वेगवेगळे अवतार

Samantha Ruth Prabhu
OTT प्लॅटफॉर्म बद्दल सांगताना ती म्हणाली, ''मला वाटत नाही की आज मला वेब शोमध्ये, एका व्यावसायिक चित्रपटात राजी (Raji) सारखी गडद आणि स्तरित भूमिका मिळाली असती. मला ती संधी कधीच मिळाली नसती. OTT प्लॅटफॉर्ममुळे, जोखमीच्या, अद्वितीय, वैविध्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक भूमिकांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. मला विश्वास आहे की यामुळे पूर्वी टाइपकास्ट झालेल्या कलाकारांसाठी खेळाचे मैदान खुले झाले आहे. मी इतर प्रत्येक चित्रपटात गोंडस मुलीची भूमिका करून कंटाळले होते आणि मला विश्वास आहे की मी आता ते करण्यास इच्छुक देखील नसेन. माझ्यासारखे अभिनेते बरेच काही करण्यास सक्षम आहेत आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा ते दाखवतात.''
Web Title: Samantha Ruth Prabhu I Was Tired Of Playing The Cute Girl In Films
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..