Sameer Wankhede Biopic: वानखेडेंचा बायोपिक नको रे बाबा! निर्माता घाबरला?

Sameer Wankhede Biopic
Sameer Wankhede BiopicEsakal

मुंबईत NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या बायोपिकची निर्मिती करणार येणार आहे अशी बातमी नुकतीच समोर आली आहे. वर्षा अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची तयारी सुरु होणार असल्याचा दावाही करण्यात आला होता.

त्यातच या चित्रपटाच्या लेखन टीममध्ये टीव्ही पत्रकार निधी राजदान यांचाही सामावेश असेल असंही सांगण्यात आलं होतं. समीर वानखेडे यांच्याशी झालेल्या संवादावर हा चित्रपट अवलंबुन असेल असे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sameer Wankhede Biopic
Naatu Naatu wins Oscars 2023: भारताला ऑस्कर मिळवुन देणारे M M Keeravani आहे तरी कोण?

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक 'मैं अटल हूं'च्या निर्मात्यांपैकी एक असलेला झीशान अहमद मुंबईत NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या बायोपिकची निर्मिती करणार अशी चर्चाही रंगली होती.

Sameer Wankhede Biopic
शाहरुखच्या लाडक्या लेकाला बेड्या ठोकणाऱ्या Sameer Wankhede यांच्यावर येणार बायोपिक..

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेले माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या बायोपिकवर काम सुरू झाल्याची माहिती अमर उजालालाने सर्वात पहिले दिली होती. चित्रपटाच्या लेखन टीममध्ये सहभागी असलेल्या प्रीतम झा यांनी सध्या केवळ चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचं मान्य केलं होतं.

पण, समीर वानखेडे यांच्या बायोपिकमध्ये 'मैं अटल हूं'चे निर्माते झीशान अहमदचे नाव समोर येताच चर्चांना उधाण आलं. मात्र आता झीशानने समीरच्या बायोपिकशी त्याचा कोणताही संबंध असल्याचे नसल्याचं सांगितलं आहे.

'अमर उजाला'च्या वृत्तानुसार त्याने सांगितले की, समीर वानखेडे यांच्या बायोपिकशी माझा काहीही संबंध नाही. याबाबत कोणीतरी जी काही माहिती दिली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे.

Sameer Wankhede Biopic
'माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा तमाशा करु नका',Satish Kaushik यांच्या पत्नीचा संताप अनावर..

समीर वानखेडे हे प्रसिद्धीच्या झोतात तेव्हा आले जेव्हा त्यानी सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबर 2021 रोजी कथित अंमली पदार्थ सेवन आणि तस्करी प्रकरणी अटक केली.

Sameer Wankhede Biopic
Oscar 2023 : 'तुझ्या कोटवर वाघाचे चित्र का?' पत्रकाराच्या प्रश्नावर NTR चं भन्नाट उत्तर!

तथापि, या प्रकरणाबाबत त्यांच्या विभागावर बरीच टीका झाली आणि नंतर तपासादरम्यान आर्यन निर्दोष असल्याचे आढळून आले. त्यांनतर या प्रकरणाला वेगळेच वळणं आले. समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयूष्यावरही अनेक प्रश्न उपस्थीत करण्यात आले होते आणि हे प्रकरण बरेच गाजलेही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com