इक्यूमिनिकल ज्यूरी पुरस्काराने समित कक्कड सन्मानित

टीम ई सकाळ
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई : अनेक आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठसा उमटविणाऱ्या ‘हाफ तिकीट’ सिनेमाने ५७ व्या ‘झिलन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’(Zlin International Film Festival) मध्ये ही आपली मोहोर उमटवली आहे. प्रयोगशील तरूण दिग्दर्शक म्हणून अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणार्‍या समित कक्कड यांना प्रतिष्ठेच्या इक्यूमिनिकल ज्यूरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत फार थोड्या भारतीय दिग्दर्शकांना हा सन्मान मिळाला आहे. जगातील सर्वात मोठा चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हल अशी ‘झिलन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ची ख्याती आहे.

या पुरस्काराबद्दल बोलताना समित कक्कड म्हणाले की, माझ्यासाठी व माझ्या संपूर्ण टीमसाठी हा सुवर्णक्षण आहे. मराठी सिनेमा आज जागतिक स्तरापर्यंत येऊन पोहचल्याचा आनंदच आहे. भारतीय चित्रपटांची दखल आज जागतिक स्तरावर घेत असल्याचा आनंद व्यक्त करताना अधिकाअधिक भारतीय सिनेमांना हा सन्मान मिळून हे सिनेमे जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे मत समित कक्कड व्यक्त करतात.

लहानग्यांच्या भावविश्वाचा कॅनव्हास रेखाटणारा व्हिडिओ पॅलेस निर्मित व समित कक्कड दिग्दर्शित ‘हाफ तिकीट’ या चित्रपटात शुभम मोरे, विनायक पोतदार या दोन बालकलाकारांसह भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. 'काक मुत्ताई' या दाक्षिणात्य चित्रपटाचे अधिकृत रूपांतरण असलेल्या ‘हाफ तिकीट’ या सिनेमाने अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये आपला ठसा उमटवला आहे.

Web Title: samit kakkd half ticket esakal news