'सनाने बॉलीवूड सोडलं,निकाह करुन संसाराच्या वाटेवर' 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

सनाची वेगळी ओळख म्हणजे ती बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची सहकलाकार होती. बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेणा-या सनाने आपण इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते.

मुंबई - सना खानने चित्रपट क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेकांना त्या गोष्टीचं आश्चर्य वाटले होते. कमी कालावधीत बॉलीवूडमधून तिनं जाणं हे कित्येकांसाठी काही प्रश्न उपस्थित करुन गेले आहे. त्याची चर्चा सुरु आहे. विशेषत, सोशल मीडियातून त्याविषयी नेटक-यांनीही उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सना नुकतीचच विवाहबध्द झाली आहे. त्याविषयीचा एक व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाच्या अकाऊंटवरुन शेयर केला आहे.

सनाची वेगळी ओळख म्हणजे ती बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची सहकलाकार होती. बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेणा-या सनाने आपण इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. त्यावरही अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. तिच्या चाहत्यांना धक्का बसला. आता तर तिनं लग्न केलं आहे.

गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी सनाचा निकाह नुकताच पार पडला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं आपल्या बॉलीवूड सोडण्याबाबत जे विधान केलं होत. ते का याचे उत्तर तिच्या चाहत्यांना मिळाले असेल.

After Quitting Showbiz, Sana Khan Gets Married To Mufti Anaas in Intimate  Wedding, Pics Surface | India.com

सध्या सोशल मीडियावर सनाच्या निकाहचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लक्षवेधी वेशभुषा केलेल्या सनाचा लुक यात सुंदर दिसत आहे. त्या दोघांनीही पांढ-या रंगाची आकर्षक वेशभुषा केली आहे. यावेळी त्यांनी केकही कापला आहे. याविषयी ती म्हणते, ‘आज मी माझ्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आहे. अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि त्या काळात मला प्रसिद्धी, पैसा, सन्मान या सर्व गोष्टी मिळाल्या.

Sana Khan told Bollywood to serve humanity, Alvida, now married to Mufti |  MBS News

मात्र यासगळ्यात पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे धावणं हा एकमेव जगण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न मला सारखा सतावत होता. त्यावेळी काय करावं त्याचे उत्तर शोधत होते. त्यावर गरजू व्यक्तींना मदत करण्याचं कर्तव्य प्रत्येकाचे आहे. असे मला वाटले. अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल् नाही का? या प्रश्नांची उत्तर मी बऱ्याच काळापासून शोधत होते.

'हरिव्दारला गेले होते त्यावेळी तिथे मंदिरात माझ्यासोबत...'

‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये सनाने भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंडही होती.  त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर आरोपही केले. त्यानंतर तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर इंस्ट्री सोडत असल्याचे सांगितले होते.

आता काय बोलायचं,प्रसिध्द कलाकारानं चारवेळा केला आत्महत्येचा प्रयत्न​

सना म्हणाली,  जेव्हा मी माझ्या धार्मिक शिकवणीत या प्रश्नांची उत्तर शोधली, तेव्हा मला समजलं की फक्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणं हाच आयुष्याचा एकमेव उद्देश नाही. त्यामुळे मी आजपासून फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी माझी काही कारणे पक्की केली आहेत. ती मला यापुढील काळात जगण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. आता यापुढील काळात गरजूंची सेवा करणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sana Khan and Mufti Anas with a smile on their faces video viral