संचितीला गायचेय श्रेया घोषालसोबत

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

संचिती फक्त सोळा वर्षांची आहे. तिचे अनेक अल्बम हिट ठरलेले आहेत. मात्र, तरीही अजून तिचे पाय जमिनीवरच आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

संचिती फक्त सोळा वर्षांची आहे. तिचे अनेक अल्बम हिट ठरलेले आहेत. मात्र, तरीही अजून तिचे पाय जमिनीवरच आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

तिने नुकताच शबाब सावरीबरोबर "लव हुआ' या अल्बमसाठी रोमॅंटिक गाणे गायले आहे. तिने इंडस्ट्रीतील सोनू निगम, सुनिधी चौहान, साधना सरगम, वैशाली माडे अशा अनेक मोठ-मोठ्या गायकांबरोबर काम केले आहे. ती 13 वर्षांची असताना केलेला "आमची मुंबई' हा अल्बम खूप हिट झाला होता. तिने "नृत्यांगना', "जिद्द', "गहाण' अशा मराठी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. तिने कुमार सानूबरोबर मराठी चित्रपट "चकवा'साठीही गाणे गायले आहे; पण आता तिला प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिच्याबरोबर गाण्याची इच्छा आहे.

आता तिची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल की नाही, हे तिच्या चाहत्यांना कळेलच.

Web Title: sanchiti sakat wants to sing like Shreya Ghoshal