ड्रग टेस्टपासून वाचण्यासाठी अभिनेत्री रागिणी द्विवेदीने स्वतःच्या युरीनमध्ये मिसळलं पाणी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 15 September 2020

रागिणीला २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. रागिणीसोबत इतर लोकांना परप्पन अग्रहारा मध्यवर्ती कारागृहामध्ये नेण्यात आलं आहे.

मुंबई- बंगळुरु ड्रग प्रकरणात (Sandalwood Drug Case) कन्नड सिनेअभिनेत्री रागिणी द्विवेदीसोबत इतर आरोपींच्या अटकेची मुदत वाढवण्यात आली आहे. रागिणीला २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. रागिणीसोबत इतर लोकांना परप्पन अग्रहारा मध्यवर्ती कारागृहामध्ये नेण्यात आलं आहे.

हे ही वाचा:  तेलुगु अभिनेत्री श्रावणी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक, एक फरार  

ड्रग पॅडलिंगच्या आरोपामध्ये अटक झालेल्या अभिनेत्री रागिणी द्विवेदीने स्वतःच्या युरीनमध्ये पाणी मिसळून ड्रग टेस्टमध्ये फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. रागिणीची टेस्ट गुरुवारी बंगळुरुमधील कोणत्यातरी एका जनरल हॉस्पिटलमध्ये झाली होती. युरिन टेस्टच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीने कौणते ड्रग्स घेतले आहेत याचा शोध लावला जाऊ शकतो.

सीसीबीच्या अधिका-यांनी रागिणीच्या या वागणूकीला लज्जस्पद आणि दुर्देवी म्हटलंय. या प्रकरणात सीसीबीने १२ लोकांना आरोपी केलं आहे. ज्यामधील सात लोक रागिणी, संजना, विरेन खन्ना, रविशंकर, नियाज, राहुल, प्रतीक शेट्टी, लूम पेपर यांना अटक केली आहे. लूम आफ्रिकन ड्रग पेडलर आहे. या सगळ्यांवर फार्महाऊसवर होणा-या पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये ड्रग्स घेतल्याचा आरोप आहे.

रागिनी द्विवेदी

रागिणी द्विवेदीला गेल्या आठवड्यात अटक केली होती. ऑगस्टमध्ये नीकू होम्सकडे सापडलेल्या डायरीमध्ये ड्रग रॅकेटच्या झालेल्या खुलास्यामध्ये जवळपास १५ सेलिब्रिटींची नावं समोर आलं होती. रागिणी 'केम्पे गौडा', 'रागिनी आयपीएस', 'बंगारी' आणि 'शिवा' या सिनेमांमुळे प्रसिद्धी झोतात आली होती.   

sandalwood drug case ragini dwivedi and other accused brought to prison after judicial custody extend  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandalwood drug case ragini dwivedi and other accused brought to prison after judicial custody extend