esakal | Video : संदीप पाठकचा छोट्या मित्रांसोबत 'वाथी कमिंग' डान्स; दिला खास संदेश

बोलून बातमी शोधा

Sandeep Pathak
Video : संदीप पाठकचा छोट्या मित्रांसोबत 'वाथी कमिंग' डान्स; दिला खास संदेश
sakal_logo
By
टीम ई सकाळ

सध्या देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यामुळे सरकारने जनतेला सर्व नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. पण अनेक जण अजूनही या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. अशा वेळी अनेक सेलिब्रटी सोशल मीडियाद्वारे सर्वांना संदेश देतात. वाथी कमिंग हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर डान्स करतानाचे व्हिडीओ अनेक सेलिब्रेटींनी शेअर केले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संदीप पाठकने नुकताच या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे संदीपने त्याच्या सोसायटीमधील छोट्या मित्रांसोबत हा व्हिडीओ शूट केला असून त्याद्वारे चाहत्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला आहे. व्हिडीओमध्ये संदीप साऊथ इंडियन लूकमध्ये दिसत आहे.

संदिपने या व्हिडीओला कॅप्शन दिले, ‘मी माझ्या सोसायटीतल्या छोट्या मित्रांसोबत रील व्हिडीओ शूट केला आहे. या छोट्या मित्रांचा अभिनय क्षेत्राशी काही संबंध नसताना त्यांनी या रीलचं शुटींग खूप एंजॉय केलं. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या कोरोना काळात स्वत:ची काळजी घ्या एवढा संदेश देण्याचा छोटा प्रयत्न. गोड मानून घ्या.' कोरोना काळात हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, वाफ घेणे आणि मास्क घालणे या सगळ्या नियमांबद्दल संदीप आणि त्याच्या सोसायटीमधील मुलांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

हेही वाचा : 'तिसरं मूल जन्मास घालणाऱ्यांना तुरुंगात डांबा'; वाढत्या लोकसंख्येबाबत कंगनाचं ट्विट

हेही वाचा : 'कुछ तो गडबड है दया'; शिवाजी साटम यांनी सांगितला डायलॉगमागचा भन्नाट किस्सा

'असा मी असामी’, ‘लग्नकल्लोळ’, ‘जादू तेरी नजर’, ‘ज्याचा शेवट गोड’, ‘सासू माझी धांसू’ या नाटकांतून संदीप प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचा ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’चा वेगळा प्रयोगही खूप गाजला होता. ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एक डाव धोबीपछाड’, शहाणपण देगा देवा’, ‘रंगा पतंगा’, ‘पोस्टर गर्ल’ यांसारख्या चित्रपटांतून संदीपने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.