'मोगरा फुलला'मध्ये दिसणार संदीप-स्वप्निलची मैत्री...

Sandip-Pathak-and-Swapnil
Sandip-Pathak-and-Swapnil

‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या मित्राची भूमिका अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. या चित्रपटात तो सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या  भूमिकेत दिसणार आहे. ‘मोगरा फुलला’ 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या मित्राची भूमिका संदीप पाठक साकारत आहे. हा सुनीलचा खूपच चांगला मित्र आहे, असे हे पात्र आहे. आपण नेहमीच इच्छित असलेल्या कोणत्याही चांगल्या मित्रासारखे या दोघांचे नाते आहे. सॉफ्टवेअरच्या व्यवसायामध्ये या दोन मित्रांची भागीदारी सुद्धा आहे. सुनील कुलकर्णी सारख्या मित्राला मदत करायला हा मित्र नेहमी तयार असतो.    

सोपं काम अवघड करणारे मित्र कठीण असतात... या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केले आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचा मित्र बनलेला संदीप पाठक यांचा वेगळाच लुक यामध्ये बघायला मिळत आहे. वेगळ्या गेटअपमधील संदिप पाठक तर या फोटोमध्ये कमालीचा वेगळा दिसत आहे. या दोघांची केमिस्ट्री यातून व्यक्त होत असून, त्यांच्यातील मैत्रीचा पोत त्यातून अधोरेखित होतो.

आपली भूमिका आणि अभिनयाविषयी बोलताना संदीप पाठक म्हणाला की ‘मला अभिनेता म्हणून नेहमी असं वाटतं की चांगल्या कथानकात आपला सहभाग असावा, प्रत्येक पात्राला महत्व असलेला सिनेमा करायला मिळावा. उत्तम दिग्दर्शक, अनुभवी कलाकारांसोबत काम करता यावं, दर्जेदार प्रोजेक्टमधे आपला खारीचा वाटा असावा, माझ्या ह्या सगळ्या इच्छा  "मोगरा फुलला" या सिनेमातून पूर्ण होत आहेत हे मी प्रेक्षकांना, वाचकांना नककी सांगु शकतो. मला ही संधी श्रावणीताई देवधर, स्वप्नील जोशी, कार्तिक सर आणि जीसिम्स प्रॉडक्शन्सने दिली’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com