मराठी मालिकेत बाहुबली! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

सध्या भारतात बाहुबली फिवर पसरला आहे. बाहुबली प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. "बाहुबली'मध्ये शिवलिंग खांद्यावर उचललेला प्रभास प्रचंड लोकप्रिय ठरला.

मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्येही हा बाहुबली फिवर दिसत आहे. "स्टार प्रवाह'वर 22 मेपासून सुरू होत असलेल्या "कुलस्वामिनी' या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यात अभिनेता संग्राम साळवी याने बाहुबलीप्रमाणेच देव्हारा खांद्यावर उचलून घेतल्याचे दिसत आहे. या घरात देवीला स्थान नाही, असे म्हणत त्याने देव्हारा खांद्यावर घेतला आहे. दमदार प्रोमोमुळे या मालिकेचे कथानक आणि संग्रामच्या भूमिकेविषयी उत्सुकता वाढली आहे. 
 
Web Title: Sangram Salvi in Kulswamini Serial. Sangram Salvi as Bahubali