'अल्लाह मेरी दुआ कबूल करो!' सानियाच्या त्या पोस्टनं वेगळीच चर्चा|Sania Mirza | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sania Mirza viral post Saudi Arabia trolled Shoaib Malik

Sania Mirza : 'अल्लाह मेरी दुआ कबूल करो!' सानियाच्या त्या पोस्टनं वेगळीच चर्चा

Sania Mirza viral post saudi arabia trolled shoaib : प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असते. गेल्या वर्षांपासून सानिया तिच्या वैवाहिक आय़ुष्यातील वादळामुळे नेटकऱ्यांच्या रडारवर आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. वेगवेगळे प्रश्न विचारुन हैराण केले आहे.

आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंनी सानिया ट्रोल झाली आहे. सानिया तिच्या कुटूंबियांसमवेत सौदी अरबला गेली होती. त्यावेळी कुटूंबासमवेत फिरतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स भन्नाट आहे.

Also Read : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

सानियाच्या त्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ती तिच्या कुटुंबासमवेत दिसते आहे. यासगळयात तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक न दिसल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे. यापूर्वी देखील सानियाला तिच्या वेगवेगळ्या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी छेडल्याचे दिसून आले आहे. सानियानं मात्र नेटकऱ्यांना कोणतेही उत्तर दिलेले नाही. विशेष म्हणजे सानियाच्या त्या फोटोंवर शोएबची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नात्यामध्ये आलं अंतर....

गेल्या वर्षी सानिया आणि तिचा पती शोएब मलिक यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे दिसून आले. शोएबच्या पोस्टनंतर त्यांच्या नात्यातील दुराव्याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली होती. दरम्यान सानियानं देखील आता फक्त देवालाच माझी काळजी असे म्हटले होते. जगभरामध्ये मोठा चाहतावर्ग असणाऱ्या सानियाच्या त्या बातमीनं मोठी खळबळ उडाली होती. आताही व्हायरल झालेल्या फोटोंवरुन सानियाला ट्रोल करण्यात आले आहे.

काही नेटकऱ्यांनी सानियाच्या त्या व्हिडिओवरुन तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. एकानं तिला तुझ्यासोबत शोएब मलिक का दिसत नाही असा प्रश्न विचारुन तिला ट्रोल करण्यात आले आहे. सानियानं या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅमनंतर निवृत्तीची घोषणा केली होती.