Happy Birthday Sanjay Dutt : संजूबाबा पोहोचला साठीत!

टीम ईसकाळ
सोमवार, 29 जुलै 2019

आज साठाव्या वाढदिवसानिमित्त त्याचा 'केजीएफ चॅप्टर 2'मधील खलनायकाचा लूक लॉन्च झालाय.

बॉलिवूडच्या लाडक्या संजूबाबाचा आज साठावा वाढदिवस! 'रॉकी'पासून सुरू झालेला संजय दत्तचा प्रवास आजही तितकाच रोमांचक आहे. आज साठाव्या वाढदिवसानिमित्त त्याचा 'केजीएफ चॅप्टर 2'मधील खलनायकाचा लूक लॉन्च झालाय. तसेच संजय पहिल्यांदा 'बाबा' या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. 

अभिनय गुणांनी संपन्न असलेल्या सुनिल दत्त आणि नर्गिस यांचा संजय हा मुलगा... सुरवातीला त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले होते. ते सोडवण्यासाठी वडिल सुनिल दत्त यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

Image result for sanjay dutt

एक संकट जात नाही, तेवढ्यातच त्याच्यावर मुंबईतील 1992च्या दंगलीनंतर झालेल्या बॉम्बस्फोटात तो सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. बेकायदा शस्त्र बाळगण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. यासाठी त्याला 5 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. कारावास भोगून तो बाहेर पडला. 

 sanjay dutt khalnayak

त्यानंतर पुन्हा त्याने चित्रपटात काम सुरू केले. त्याच्या जीवनावर आधारित 'संजू' हा चित्रपटात आला होता. यात रणबीर कपूरने संजय दत्तचे काम केले होते. 

 sanjay dutt in lage raho munna bhai

संजय दत्तचे गाजलेले चित्रपट
रॉकी, साजन, खलनायक, वास्तव, सडक, मुन्ना भाई एबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई हे त्याचे काही गाजलेले चित्रपट.

Image result for vastav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Dutt Birthday special