Trishala Dutt Photo: संजय दत्तच्या मुलीच्या शरीरावर त्या खुणा कसल्या? |Sanjay Dutt Daughter Trishala Dutt Stretch Marks | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trishala Dutt Photo News

Trishala Dutt Photo: संजय दत्तच्या मुलीच्या शरीरावर त्या खुणा कसल्या?

Sanjay Dutt Daughter Trishala Dutt Stretch Marks: बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा वेगळाच दबदबा टिकवून ठेवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये संजय दत्त हा नेहमीच आघाडीवर असतो. त्याच्या बाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा या व्हायरल होत (Bollywood Actor) असतात. सध्या संजय दत्त हा त्याच्या मुलीच्या त्रिशालाच्या फोटोमुळे चर्चेत आहे. त्याच्या मुलीच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसून आले आणि (bollywood actress) वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. शेवटी त्रिशालाची सावत्र आई मान्यतानं त्यावर खुलासा करत ते व्रण कसले आहेत हे सांगितले आहे. त्रिशाला ही एक मनोचिकित्सक आहे. सोशल मीडियावर व्हायरल असलेल्या (Social media viral news) स्टारकिड पैकी ती एक आहे.

संजय दत्तची मुलगी ही सोशल मीडियावर लाईमलाईटमध्ये असणारी सेलिब्रेटी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे काही बोल्ड फोटोही व्हायरल झाले आहे. संजु बाबाच्या मुलीच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंतीही मिळाली आहे. आता तर तिनं जो फोटो शेयर केला आहे त्यावरुन तिला चाहत्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. त्रिशालानं आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्सचे फोटो पोस्ट केले आहेत. हे काय आहे, केव्हा झालं, असे प्रश्न तिला तिच्या फॅन्सनं विचारले आहेत. त्रिशाला ही संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. त्रिशाला आणि तिची सावत्र आई मान्यता यांच्यातील रिलेशन हा नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांच्या गॉसिपिंगचा विषय असतो.

त्रिशालाच्या त्या फोटोवर मान्यतानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. काल त्रिशालानं ते फोटो पोस्ट केले होते. त्यातमध्ये ती बॅकलेस व्हाईट कट आऊट ड्रेस परिधान केल्याचे दिसते आहे. तशाप्रकारची ड्रेसिंग करुन तिनं आपले स्ट्रेच मार्क्स दाखवण्याचा प्रयत्न केला असून तो नेटकऱ्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे त्यावरुन तिला काही प्रश्नही विचारण्यात आले आहे. त्रिशालानं मोठ्या बोल्ड अंदाजात ते फोटो पोस्ट केले आहेत.

Trishala post

Trishala post

Trishala news

Trishala news

फोटो शेयर करताना त्यावर तिनं एक मोठी नोटही लिहिली आहे. त्या मार्क्सविषयी ती सांगते की, ही फार जुनी गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात ते व्रण आता पुसट होत चालले आहे. मान्यता दत्तनं यावेळी फायर इमोजी शेयर केला आहे. त्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे. मान्यताला मात्र त्रिशालाचे फोटो आवडले आहेत.

Web Title: Sanjay Dutt Daughter Trishala Dutt Stretch Marks Mother Manyata Comment On Photo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..